मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

" म्हणून आपण जगतो "

" म्हणून आपण जगतो "

                           000o000

                ' आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्द्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज मृत्युला कवटाळाव अस वाटत नाहीं '

               

वपूर्झा / 077/Surendra /31122024

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

" मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे "

" मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे   "

                           000o000

                  ' इट जस्ट हॅपन्स '   म्हणत पुढच्याच क्षणी जी माणस कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपल वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य ? 'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे ' -- अकरा शब्दात समर्थांनी सगळ उकलून दाखवलं. 

वपूर्झा / 088/Surendra /29122024

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

'मानवंदना मिळायची ती युनिफॉर्म मधल्या आतल्या माणसाला"

'मानवंदना मिळायची ती युनिफॉर्म मधल्या आतल्या माणसाला"

                           000o000

            '  सेवानिवृत्ती नंतर अनेकांची अवस्था बघवत नाही. कुत्र विचारत नाहीं नंतर. पण काही माणसांचा मान टिकतो. पूर्वीइतकाच. कारण ते अधिकार पदावर असताना सोसायटीने त्यांना जेव्हा सलाम केला, तेव्हा तेव्हा तो खुर्चीला नव्हता आणि युनिफॉर्मलाही नव्हता. ती मानवंदना मिळायची ती युनिफॉर्म मधल्या आतल्या माणसाला. काही माणस खुर्चीचा आणि युनिफॉर्मचा उपयोग फक्त दरारा बसविण्यासाठी, फायद्यासाठी करतात.  त्यांची घर शांत तृप्त असतात. वाममार्गाने पैसा मिळवायला कधी कधी आम्ही बायकाच नवऱ्यांना भरीस पडतो. ऐषआरामाचा आम्हाला प्रथम मोह होतो, तो स्पर्धेतून, नथिंग एल्स '                

वपूर्झा / 090/Surendra /27122024

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

' चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का? '

" चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का?

                           000o000

               चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का? ' हो ' आणि ' नाही ' ही.           ' तुलना ' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपल ! ही राक्षसीण येतांना एकटी येत नाही. तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हाला बहिणीच्या स्वाधीन करते आणि दुसऱ्या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघून जाते. ह्या बहिणीच नाव ' तडजोड '. ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते.              

वपूर्झा / 094/Surendra /26122024(२)

" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं.

"  मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. "

                           000o000

               ' मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या - पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचवा म्हणून केलेल्या प्रार्थंनांशी त्यांचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.'          

 वपूर्झा / 095/Surendra /26122024

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

" तुमचं सगळ बालपण दुःखाने भरलेलं होत, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? "

"  तुमचं सगळ बालपण दुःखाने भरलेलं होत, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो?   "

                           000o000

               प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसर बालपण जगण्याची संधी मिळवून देत आणि काळाबरोबर पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृध्द करत. जनरेशन  गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा, आपण आपल बालपण नव्याने अनुभवावं, अशी वृत्ती असते, तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडवास वाटत. तुमचं सगळ बालपण दुःखाने भरलेलं होत, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा  जबाबदार होऊ शकतो?               

वपूर्झा / 096/Surendra /25122024

" स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ?"

"  स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ?"

                           000o000

               स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचौघात आपल्या मित्रांशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधर्मियांच्या शोधात असतो. Birds of the sane feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपल वर्तन कस होत आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकल तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटल तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो.

वपूर्झा / 101/Surendra /24122024

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

" आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत "

"आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत   "

                           000o000

               यांत्रिक हालचालीने हसता येतं. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हे. ' ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात ' अस कुणी म्हटल, तर नव्याने प्रसन्न कुठे वाटते?' आणि रडतांना कुणी फोटो काढत नाहीत. रडण भोगायच असत. हसण उपभोगायचं असत. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

वपूर्झा / 104/Surendra /2312024

" गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही. "

" गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही. "

                           000o000

               धोबीघाटावर धबाधबा  कपडे आपटणाऱ्या एखाद्या धोब्यापेक्षा क्राइम ब्रांचचा ऑफिसर वेगळा असायला हवा. धोबिघाटापेक्षा खुबीघाटावर समोरच्या माणसाला बोलत करायला हवं. मार खाण, हा त्या लोकांचं प्रारंभी अनुभवाचा, मग सवयीचा आणि शेवटी व्यसनाचा भाग होतो. मार देणाऱ्या माणसालाही कमी कष्ट होत नाहीत. सारखी संतापण्याची सवय लागते. तेव्हा मार खाऊन वठणीवर येणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हळू हळू कमी होते. ह्यापेक्षा मनाला हात घाला. पोलिसी व्यवसाय  दंडूक्यापेक्षा बुद्धीने करा. समोरच्या माणसाचं बलस्थान शोधण्यापेक्षा, तो दुर्बल कशाने होतो ते जाणून घ्या. प्रहार तिथे करा. त्याला मारझोड करण म्हणजे त्याच्या बलस्थानाशी झुंज देण्यासारखे आहे. मारलं की गुन्हा कबूल केला जातो, हा एकच नियम जर आयुष्यभर सांभाळलात, तर तुमच्याही बुद्धीची वाढ होणार नाही. फक्त झोडपून काढून प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर चार पैलवान नेमून काम भागल असत. गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही.                                       

वपूर्झा / 105/Surendra /2212024(२)

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "

" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "

                           000o000

               नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरत चिरंजीव होत. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. 

" साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असत. त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही "         

वपूर्झा / 108/Surendra /2212024

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

".भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आह"े

".भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे   "

                           000o000

               भाऊबंदकीच आपल्या महाराष्ट्रात बारमाह पीक येत. त्याशिवाय आणखी एक पीक आहे. ह्या पिकाला पाऊस नको. जमिनीची निगा राखायची कटकट नको. विहीर न खणताच " ती खणली " अस दाखवून सरकारी खर्च वसूल करण नको. ह्या पिकाला खडकाळ जमीन पण चालते. ह्या शेतात " कंड्या" पिकतात. सर्वात जवळचे नातेवाईक हे पीक काढतात. हे भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे. पण फुटीर बाणा हा तर आयुष्याचा कणा आहे.        

वपूर्झा / 108/Surendra /21122024(२)

. सवय वैरीण, आणि तिला जन्म देणारे आपणच. "

". सवय वैरीण, आणि तिला जन्म देणारे आपणच.   "

                           000o000

               गादी - उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटनीला आली नाहीं तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाहीं हो रात्रभर. 

रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते.

सवय वैरीण, आणि तिला जन्म देणारे आपणच.             

वपूर्झा / 111/Surendra /21122024

" मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत. "

" मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत.     "

                           000o000        

             मित्रामित्रांच्या वां दोन स्त्रियांच्या दोस्तीबाबत बघणाऱ्यांच्या डोळ्यांचा नंबर कमीजास्त होत नाही. पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटल की रामायणातल्या लंकेतले नागरिक आणि महाभारतातील कौरव एकत्र येतात. पांडवांप्रमाणे क्रमाक्रमाने, जाणिवेने पौरुषत्वाने द्रौपदीची जबाबदारी न उचलता, निव्वळ घटकाभर करमणूक म्हणून द्रौपदीच्या निऱ्यांना हात घालणाऱ्या कौरवांनी समाज भरलेला आहे. म्हणूनच स्त्री- पुरुष मैत्री म्हटल रे म्हटल की ती सेक्स रिलेशन साठीच असते, अशा रबरी शिक्यासकट माणस ती गोष्ट गृहीत धरतात. शिक्का सतत ओला ठेवतात. म्हणूनच त्या मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत. 

             

वपूर्झा / 112/Surendra /20122024

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

" प्रत्यक्ष पराभवांपेक्षा, तो कबूल करावा लागण हा पराभव मोठा असतो. "

" प्रत्यक्ष पराभवांपेक्षा, तो कबूल करावा लागण हा पराभव मोठा असतो. "

                           000o000              

               प्रत्यक्ष पराभवांपेक्षा, तो कबूल करावा लागण हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तुत्व कमी पडत तर कधीकधी कर्तबगारी असून, भूमीच रथाच चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी, चाकं न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. 

               प्रत्येकाचं असण हे जस त्याचं स्वतःच असण असत त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ओनरशीपच्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणका आतून फुंकर बाहेरून आत. समस्या ह्या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत जाते. जशी उमेद ओसरत असते, त्याचप्रमाणे फुंकर घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही, कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेलो असतो.           

वपूर्झा / 112/Surendra /19122024

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल? "

"   मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल?     "

                           000o000         

               अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे, शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांनाची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण. पोस्टमार्टेम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजण, बससाठी डोळ्यात प्राण आणून, बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करण, नाहीतर नोटांमागून नोटा खर्च करायची तयारी ठेऊन टॅक्सीने प्रवास करण. ' मृतत्म्याला शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे ? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ह्या शहरात ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसाची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल?            

वपूर्झा / 121/Surendra /17.122024

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

" यश म्हणजे तरी काय ?."

"    यश म्हणजे तरी काय ?."

                           000o000

               यश म्हणजे तरी काय ?  यश म्हणजे प्रकाश. प्रकाश असतो तरी किंवा नसतो तरी, पण दोन्हीं अवस्थेत त्याच्या.   प्रभावाच किंवा अभवाचं अस्तित्व मानावच लागत. तीच गोष्ट यशाची. त्यामुळे शिखरापाशी पोचलेला हा यशस्वी असतोच, पण त्याच वेळेला मिळालेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी तितकेच लहान - मोठे खड्डेही ह्याच वाटचालीत निर्माण झालेले असतात, आणि उंचावरून ज्याचे त्याला हे खड्डे, ह्या दऱ्या जास्त ठळकपणे जाणवतात. ह्या वाटचालीतले काही खड्डे काही व्यक्तींना पटकन दिसतात. त्यातही बायको ही पहिली व्यक्ती. तिला नवऱ्याच्या यशाच्या शिखराअगोदर खड्डेच प्रथम दिसतात. ह्यात तिची चूक नाही. कारण ती त्यांचं दुसरं चाक. तिला त्या खड्यांचे शारीरिक, मानसिक,आर्थिक, लौकिक हादरे जास्त बसतात. ह्या हादऱ्याबरोबरच नवऱ्याकडे कुणी बोटं उगारता कामा नये, हा तिने स्वतःच घालून घेतलेला दंडक असतो. सवलत वा संशयाचा फायदा ती तिच्या कोर्टातल्या आरोपीला द्यायला तयार नसते. तिची ती भूमिका योग्य असते. कारण ज्योत जळून तेजोमय ठरते, संमई नुसतीच तापत राहते.        

वपूर्झा / 138/Surendra /15122024

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

" संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग."

" संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग."

                           000o000

               गुलामगिरीत आयुष्य काढायचं म्हणजे डझनाच्या हिशोबानेच मुलं हवीत अस नाही. पाळणा एकदा हलला तरी पुरतो. पाळणा मुळीच हलला नाही तरी तुरुंग चुकत नाही. नवरा असतोच.

               तो बांधलेला असूनही मोकळा. बाई कायम बंदिवान. म्हणूनच, लग्न न करणाऱ्या बाईबद्दल कुचेस्टेने बोलल्याशिवाय त्यांना त्यांच्या पायातल्या बेड्या हलक्या वाटत नाहीत. संसार कसाही असला, नवरा कितीही विक्षिप्त असला तरी उभ्या आयुष्याचं सार्थक, कपाळावरच्या टिकलीच्या आकाराच होत.

               संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग. कारण या तुरुंगातले कैदी, इतर मोकळी माणस कैदी कधी होतील ह्याची वाट बघत असतात. तुरुंगाच्या कोठड्या जास्तीत जास्त शोभिवंत करतात. आपल्या किती पिढ्या ह्या अशाच तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगून नांदल्या ह्याच्या कहाण्या सांगतात. लग्न न करण हाच गुन्हा असतो हे कोठडी - कोठडीतील गुन्हेगार आपापल्या मुलांना सांगतात.

वपूर्झा / 139/Surendra /14122024

"होणाऱ्या किंवा नवविवाहित वधुवरांसाठी महत्वाची टीप"

"होणाऱ्या किंवा नवविवाहित वधुवरांसाठी महत्वाची टीप"   

                           000o000

            अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे.

अ : अर्पण भाव.      क्ष : क्षमाशीलता.          ता : तारतम्य.

 हे तीन गुण दोघांजवळ हवेत. 

               प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यावरच्या पट्ट्या उतराव्यात.

               एकमेकांच्या वृत्त्तींचा खरा मागोवा घ्यावा.  सप्तकातले किती सुर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासाव. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना मुरड घालू शकणार आहोत, त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालण हा सहजधर्म व्हायला हवा . कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकंण ह्यालाच अर्पणभाव म्हणतात 

               स्वतःतल्या उणीवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता.           

                तरतमभाव न बाळगता घ्यायचं कस आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि वाकवायला,स्थळ,काळ,स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य.     

वपूर्झा / 142/Surendra /13122024

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

"संसार क्रिकेट सारखा असतो ."

"संसार क्रिकेट सारखा असतो ."

                           000o000

            " पारितोषिक, प्रशस्तिपत्रक, कप , पेले ,सुवर्णपदक," म्हणजे ' यश ' नव्हे . ती ' किर्ती ' .   यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, स्वाशाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेट समोर उभ राहिल की प्रत्येक बॉलच काहीतरी करावं लागत.   ' भूत, वर्तमान, भविष्य म्हंजे तीन स्टॅम्पस ' अस एक क्रिकेटीयर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणे, थांबवणं, टोलवण यापैकी काहीतरी एक करावच लागत. तुम्ही जर बॉलर्स एंडला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळाप्रमाणे इथ पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये, म्हणून जपायच असत. साथीदाराशीच स्पर्धा केलीत तर कदाचित आपल्याला 

पॅव्हिलियन मध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडू बरोबर खेळताना पाहावं लागेल.

वपूर्झा / 146/Surendra /12122024

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

" पुरुष म्हणजे दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्म सांभाळणार जंक्शन. ."

" पुरुष म्हणजे दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्म सांभाळणार जंक्शन.  ."

                           000o000

          नोकरी करता तेव्हा तुम्ही काय करता ! जातीने - गोतीने एक नसलेल्या वरिष्ठाला मनातून शिव्या देत, प्रत्यक्षात तुम्ही माना वाकवताच ना! त्याची प्रसंगी मुर्खासारखी बोलणी सहन करताच ना ! अपराध नसतांना शिक्षा सहन करताच ना ! मग तशीच थोडी पॉलिसी घरी का वापरू नये? दुसऱ्यासाठी नाही, स्वतः साठीच! द्या थोडा मोठेपणा घरातल्यांना! एवढं काय नुकसान होणार आहे त्याने? घरातल्या माणसांशी अस दुटप्पी वागण्याची वेळ येऊ नये हे मान्य, पण दुर्दैवाने माणस तशी भेटली तर काय इलाज? त्या मोठ्या माणसांचे स्वभाव तसे का बनत गेले त्यालाही काही कारण आहेत, इतिहास आहे. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनीही झगडा दिला आहे, पराभव पचवले आहेत. हे सगळ कुणी पाहायचं? याचा विचार कुणी करायचा? मी एकट्याने? कारण मला बायकोही हवी आणि आईही हवी, हा माझा दोष! मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाचं बारीक निरीक्षण केलं आहे. तिच्या स्वभावातल्या गुणांपेक्षाही तिच्यात ह्या वयात निर्माण झालेले दोष मला जास्त माहीत आहेत. त्या दोषांसकट तिला कोणीतरी सांभाळायला हवं आहे. 

          सगळ्यांचं व्यवस्थित होणार आहे. आईच्या मार्गाने आई जाणार आहे. पत्नी चाललीच आहे. लोंबकळतो काय तो मीच!  एका गाडीने आपण प्रवासाला निघायचं. ठराविक स्टेशन पर्यंत आपला त्या गाडीने प्रवास व्हायचा. नंतर गाडी बदलायची आणि पुढच्या मुक्कामाला पोचायचं. दोन्ही गाड्या सारख्याच महत्वाच्या! पहिली गाडी वेळेवर पोचायला हवी. दुसरी प्रवास पुरा करण्याइतकी तेवढीच ताकदवान हवी. पण दोन्ही गाड्यांना प्रवासापेक्षा स्वतःच्या गतीच आणि दिशेच जास्त महत्त्व वाटत. अस ज्या ज्या घरात घडत, त्या त्या घरातला पुरुष स्वतःला प्रवाशी समजतो. पण तो असतो निव्वळ मधल जंक्शन. दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्म सांभाळणार जंक्शन. 

वपूर्झा / 145/Surendra /10122024

" आपण आपला संसार चालवतो अस रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही ."

"   आपण आपला संसार चालवतो अस रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही ."

                           000o000

          कुंवतीनुसर कलावंतांसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खर तर छोटी माणसं, मोठी माणस अस काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की की नुसत '. राम ' हे नाव मोठं? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तूने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेलं काम करायला हव. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनचा शोध लावणारा वॅट मोठा, हे कोण नाकारील? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅट पेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्या शिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो अस रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक  ज्ञात - अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्स पायी आपली साधी साधी काम कशी रखडतात, हे आठवून पाहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचही स्मरण ठेवाव.        

वपूर्झा / 147/Surendra /09122024

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

" ' मी अडाणी माणूस आहे ' ."

"  ' मी अडाणी माणूस आहे '     ."

                           000o000

          आयुष्याच पुस्तक वाचायला निराळच  इंद्रिय लागत. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच ह्या पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याच पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? - कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागत, तेव्हा ह्या माणसाची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसच निराळी. चार बुक शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपल ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी  कधी मांडून ठेऊ अस होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःच नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात. 

-----------------------------------------------------------------------

वपूर्झा / 149/Surendra /08122024(2)

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

" हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे. ."

"   हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे. ."

                         000o000

          गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असत. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असत. कामाचं त्रैराशिक आठ तासांच्या पाढयांवर आखलेल असत, सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची वेसण सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकूमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्याउलट कामाचं नातं भक्तिशी जडल तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणींवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाहीत अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात. सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्याउलट विश्वास, प्रेम वात्सल्य ह्यांनी एकदा माणसं  बांधून ठेवली की मालक मुक्त होतात. टवटवीत असतात. हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे.                       

वपूर्झा / 149/Surendra /08122024 

" संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? ."

" संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो?   ."

                              000o000

          काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तुला विसंवादाची वाळवी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतय. इतक्या झपाट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगाच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगल पत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगलपत्रिकेगणिक गणपतीबाप्पा नाविन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्या पेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पौरोहित्य करणाऱ्या  गुरुजिंपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंसंकारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धिवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याच हे विदारक उदाहरण. खर तर सगळ्या मंगळकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत.         ' श्रृती मंगल थिएटर ' , ' आनंद थिएटर ' अस म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटणच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? 

 वपूर्झा / 153/Surendra /07122024(2).

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस सांभाळू शकतो. ."

" आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस सांभाळू शकतो.    ."

                           000o000

            " सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे * भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडी वाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य. बुध्दी हे सौंदर्याचंच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतही काम भक्तीने करण हेच सौंदर्य आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवण ही कुरूपता.

           समोरच्या चालत्या - बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस सांभाळू शकतो.

              

वपूर्झा / 155/Surendra /07122024 

" शिक्षण म्हणजे काय? ."

"    शिक्षण म्हणजे काय?  ."

                          000o000

          शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरसच विसरलं गेलं तरी चालत. व्यवहारात मिळत ते शिक्षण वेगळ. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा - माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करण वेंगळ आणि गणित समजण वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताचं आकलन होण ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या. तेवढ्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून. दोन रुपयांचा नारळ, पाच रुपयांचे पेढे, आठ आण्यांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दहा पैसे एवढ्या साधनांवर माणूस देवळापर्यंत पोचतो. देवापर्यंत जातो का?

                

वपूर्झा / 163 /Surendra /06122024 (2,)

" स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो."

"  स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो."

                           000o000

          समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक,मित्र, थोडक्यात म्हणजे, ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो, ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मन ही अशी सहजी मारता मारता, दूरभिमान स्वतःचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेवढाच फक्त जतन केला तर  वर्तुळातली माणसही त्याची बूज राखतात. स्वाभिमानाची सोयरिक कर्तुत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला ' पोकळ ' विशेषणाचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या.   लहरीपाई त्याला सत्तेपुढे नमत घ्यावं लागत. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वायत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो. ' स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.

वपूर्झा / 164 /Surendra /06122024

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. ".

"  भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही.  ".    

                           000o000


          पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला अस समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल. पहाड वेगवेगळे असतील. त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच तेच काम सातत्याने करत असतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काहीतरी चुकल असेल, पुढच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, अस म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधामागे लागतो. विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे.

        

       

वपूर्झा / 170  /Surendra /04122024(2)

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

".स्वतःच्याच सावलीवर जो भाळला , तो फसला. ".

".स्वतःच्याच  सावलीवर जो भाळला , तो फसला.    ".    

                           000o00oo

          ' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वापरायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्यांचं ' हरवण, सापडण, हुरहूर वाटण ' हे सगळ भावविश्व स्वतंत्र असत. या अनंत प्रवासात कितीतरी मित्र भेटतात. ' या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' अस वाटायला लावणारी अनेक माणस, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात.          ' जगावं, अस काहीतरी एक आहे ' अस वाटायला लावतात. काही काही जणांना एका ठराविक हॉटेलमधल जेवण आवडत. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीत घडत. स्वतःच्याच  सावलीवर जो भाळला , तो फसला.  

वपूर्झा / 172  /Surendra /04122024


" माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'

  "     माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'   "

                                 000o000

            सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा अंतरमनातल्या विणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द ' जास्त '. दयाट्स ऑल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मोठ घर, जास्त वरच पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त! त्यासाठी राजकारण, युती करायची ती देशासाठी नाही, तर जास्त खुर्च्या हव्यात म्हणून. ' पंजाब, सिंध, गुजराथ' असं देशाचं विस्तीर्ण वर्णन करायच. पण ह्यांचा भारताचा खरा मनातला आकार दोन फूट बाय दोन फूट खुर्ची इतकाच आहे.'


           तुला भारताचा पंतप्रधान केल तर तू काय करशील? सेक्युलर राष्ट्र हेच ध्येय पुढे चालवशील का? ' माझ्या सगळ्या राष्ट्राचा धर्म ' आनंद ' असेल आणि ध्येय असेल - महोत्सव, 'सेलिब्रेशन '! माझ्या राष्ट्राचा झेंडा असेल आकाशासारखा निळा. जमिनी बळकवता येतात, आकाशाचा लिलाव मांडता येत नाही, स्वतःच्या ' फार्म ' चे फलक ठोकता येत नाहीत. माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.' 



वपूर्झा / 172 /Surendra /03122024(2)


" माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'

  "     माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'   "

                                 000o000

            सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा अंतरमनातल्या विणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द ' जास्त '. दयाट्स ऑल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मोठ घर, जास्त वरच पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त! त्यासाठी राजकारण, युती करायची ती देशासाठी नाही, तर जास्त खुर्च्या हव्यात म्हणून. ' पंजाब, सिंध, गुजराथ' असं देशाचं विस्तीर्ण वर्णन करायच. पण ह्यांचा भारताचा खरा मनातला आकार दोन फूट बाय दोन फूट खुर्ची इतकाच आहे.'


           तुला भारताचा पंतप्रधान केल तर तू काय करशील? सेक्युलर राष्ट्र हेच ध्येय पुढे चालवशील का? ' माझ्या सगळ्या राष्ट्राचा धर्म ' आनंद ' असेल आणि ध्येय असेल - महोत्सव, 'सेलिब्रेशन '! माझ्या राष्ट्राचा झेंडा असेल आकाशासारखा निळा. जमिनी बळकवता येतात, आकाशाचा लिलाव मांडता येत नाही, स्वतःच्या ' फार्म ' चे फलक ठोकता येत नाहीत. माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.' 



वपूर्झा / 172 /Surendra /03122024(2)


" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! "

 " आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति!  "

                               Ooo0oo0

            खोटं बोलण हे एकदा रक्तात मुरलं, हाड -मांस -मज्या - रक्तवाहिन्यांप्रमाणे "  ॲनाटॉमी "चाच एक भाग झालं कीं, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करतांना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला  पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो. 

          ' माझ्या जिवाची सगळी लावतोड तुमच्यासाठी होत आहे, ह्याचा तुम्हाला पत्ता तरी आहे का? हे सगळं चाललंय ते कुणासाठी?' असा प्रश्न घरोघरी बायका आपल्या नवऱ्यांना विचारतात.

          त्याप्रमाणे, ' दिवसभर नोकरीं करतोय, त्याशिवाय ब्रोकरच काम करतोय किंवा पार्टटाइम जॉब करतोय, क्लासेस चालवतोय. ही सगळी धडपड कुणासाठी करतोय? रक्ताचं पाणी करतोय ' असली विधाने नवरेही करतात. 

          हा सगळा बकवास आहे. रक्ताचं खरोखरचं पाण्यात रूपांतर झालं, तर ते रक्तदानच. प्रत्येकजण जाता -येता RBC /WHC /टोटल काऊंटच्या तपासण्या करून घेईन. बायकोसाठी जीव गहाण ठेवणाऱ्या नवऱ्यापासून, त्याच्या बायकोने घटस्फोटहे. मागितला तर?

          ' आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! ' हे नारदानच वचनच खरं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून वाढण्यात जोपर्यंत पत्नीला आनंद आहे,  तोपर्यंतच ती तो पदार्थ करते. एकूण एक नात्याच्या, मित्रांच्या बाबतीत हे एकमेव सत्य आहे.

वपूर्झा / 173 /Surendra /03122024


शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

" गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे?

    " गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे?

" जमीन - अस्मानाइतका. गावोगावी मठ बांधून राहतात ते गुरु. गुरु होणं हा सध्या धंदा झालाय. सद्गुरू एखादाच " ' मला फरक सांगाल? ''

 'अवश्य ' 

" एक वर्ग आहे पंडित - पुरोहितांचा. चर्च, मशिदी, देवळ, गुरुद्वारा ही त्यांची स्थाने. भक्तांना गुन्हेगार आणि पपी ठरवल्या शिवाय ह्यांची आरत्यांची दुकानें चालत नाहीत. त्याच्या वरची पायरी " गुरु  " म्हणविणाऱ्यांची. " माझ्यावर सगळं सोपवा आणि तुम्ही निर्धास्त व्हा " असा या लोकांचा नारा असतो. त्यामुळे समाज पांगळा होतो. समाजानेच निवडून दिलेले राज्यकर्ते समाजाइतकेच अस्थिर असतात. कडक पोलीस बंदोबस्तात तेही देवळाच्या वाऱ्या करतात. वर्तमानपत्रात फोटो येतात. समाजाला ह्या तऱ्हेने परंस्वाधीन केल्याशिवाय अशा लोकांचं गुरुपद टिकत नाही. 

          सद्गुरूंची बाब याउलट. सद्गुरूंकडे कुणी गेलं तर, आतापर्यंत त्या माणसाने काय काय पापं केली याच्याशी त्याला कर्तव्य नसत. जे हातून घडलं त्यात समोरच्या माणसाला बदल हवा आहे, हे जाणून तो त्याच्या भूतकाळात डोकावत नाही. आपल्या हातातला दिवा घेऊन सद्गुरू शरण आलेल्या माणसाबरोबर काही काळ वाटचाल करतो. नंतर स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण कर, असं सांगून त्याच्या हातात दिवा देऊन तो निघून जातो.   

वपूर्झा / 176 /Surendra /01122024


शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

" छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत. ."

 " छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत. ." 

                           000o000

       संबंध आयुष्यभर आपण अशाच निरगाठी-सुरगाठी मारत असतो. ह्याच एकच कारण, आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचा वावर सातत्याने होत असतो. नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय घेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असत, पण बदली नको असते. लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स घेऊन खरोखरचं पर्यटनाला जावं, कीं घरातच एखादी वस्तू खरेदी करावी? धाकदपटशा दाखवून मुलांना शिस्त लावावी कीं गोडीगूलाबीने? तीच गोष्ट, नवऱ्याची सिगारेट सुटायला हवी असेल, तर असहकार पुकारावा, अबोला धरावा, का प्रेमाने जिंकावं? यासारखे कुठलेच प्रश्न असं कीं तसं, याशिवाय सुटत नाहीत. मुलांना धाक हवा. पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये, नवरा चांगला आहे,पण त्याच व्यसन नकोय. अशा छोट्या छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत.

वपूर्झा /177 /Surendra /29112024


गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

"सर्वेपि सुखीन:संतु ".

"सर्वेपि सुखीन:संतु ".    

                           000o000

             आपल्या समोर छोटी छोटी संकट येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो. आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हातरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्या नंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो कीं, " अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटत नव्हतं,   पंचवीस -पंचवीस  वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला कीं नव्वद टक्के माणसं म्हणतात, " ह्या वयात? घटस्फोट? मग पंचवीस वर्ष काय केल? पंचवीस वर्ष जास्तीत जास्त सहन केल. आंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास धटस्फोटच्याच दिशेने सुरु होतो. पिंचवीस वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केल. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका, कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला'मंगळ' कुणाचा ' वक्री राहू ' अस काहींना काही ऐकतात. जप करतात. नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतांनाही म्हणावंसं वाटतं, "सर्वेपि सुखीन:संतु ".

वपूर्झा / 179  /Surendra /28112024


मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

" संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल कीं नाही? ."

"    संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल कीं नाही?    ." 

                           000o000


          "कोमलतेत ताकद असते " ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडत. माती वाहून जाते, नंद्याना पूर येतात. भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहतं. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा -बारा फुल खाली पडतात. ज्या दगडामुळे फुल वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोमेजतात. पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केल्यास कळेल कीं त्यामागे सातत्य असत. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निधून जात. ह्या वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल कीं नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील कीं भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो. संसारातील शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या स्त्रीजवळ त्या शब्दांच रूपांतर गीतात करायच सामर्थ असेल, तर तिला मी जलधाराच म्हणेन. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याच वागण योग्यच असत. तिथे डोके आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाण चांगलं. जलधारा हो. वाहत राहा.


वपूर्झा /181-182/Surendra /26112024


सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

" योग्य वेळेची वाट पहा " असं म्हणणं काय किंवा पेशन्टला डॉक्टरांनी " वेट अँड वॉच " म्हणणं काय, सारखाच! ."

"  योग्य वेळेची वाट पहा " असं म्हणणं काय किंवा पेशन्टला डॉक्टरांनी " वेट अँड वॉच " म्हणणं काय, सारखाच!       ." 

                           000o000

          काहींना काही अपेक्षा बाळगून जी माणसं गुरु शोधतात, त्या सगळ्यांना "निरपेक्षेत आनंद आहे " हा सल्ला कसा मानवेल? साध्या नोकरीतही, शुद्ध व्यावहारिक पातळीवर, आपल्या जवळ पात्रता आहे अशा माणसांना प्रमोशनच हवं असत. ती निव्वळ व्याहारिक गरज नसते. आपल्या शिक्षणाच यथायोग्य मूल्यमापन व्हावं आणि त्या शिक्षणाचा गौरव व्हावा ही रास्त मागणी असते. नोकरीतल्या प्रथेप्रमाणे " सिनियरिटी " साठी थांबायची पाळी आली म्हणजे, एक्सप्रेस गाड्यांनी यार्डात पडून राहायचं आणि मालगाडयांनी पूढे जायचं, हे शल्य सोसत नाही. काही काही डब्यातून तर मालही नसतो, तरी ते खडखडत पुढे जातात आणि लायक माणसांना रखडवतात. रिकामा डबा आपल्या हिमतीवर कुठलाच प्रवास करू शकत नाही. हे डबे कुणाच्या ना कुणाच्या कृपेवरच पुढे होतात. लायकमाणसाने कितीही दरवाजे ठोठावले तरीही आतली कडी निघतं नाही. बंद दरवाज्यांची एकजूट झटकन होते. कारण त्या दरवाज्यांच्या पल्याड भ्याड माणसांची धरं असतात. उघडा दरवाजा सगळ्यांचच स्वागत करतो. नोकरीं करणाऱ्या माणसाचं सत्तर टक्के आयुष्य उघड्या दरवाज्याच्या शोधामध्ये जात. बंद दरवाज्यांना दार ठोठावणाऱ्याची लायकी किंवा योग्यता कशी कळणार? अशा माणसांना ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी " माझं लक्ष आहे. योग्य वेळेची वाट पहा " असं म्हणणं काय किंवा पेशन्टला डॉक्टरांनी " वेट अँड वॉच " म्हणणं काय, सारखाच!

वपूर्झा /188/Surendra /25112024


रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

" सदेह अस्तित्वाच ओझं ."

"    सदेह अस्तित्वाच ओझं   ." 



          मरण म्हणजे तिरडीवरून नेऊन स्मशानात जाळण, तेराव करून मोकळ होणं असं नाही. ती एक कृती झाली. तुमच्या आक्रोशाची नोंद न घेतली जाण ----हे मरण. अशी किती प्रेत किती परिवारात एका बाजूला पडून असतील, हे प्रत्येकाने पाहावं. त्या मरणाचा प्रत्यय perfectionist ला आला, म्हणजे आपल्या सदेह अस्तित्वाच ओझंही परिवारावर टाकू नये, असं वाटून विचारवंत जीव देत असावेत.

वपूर्झा /188/Surendra /24112024(2)


शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

" राष्ट्रात विचारांचं पीक कस उगवणार? ." आता त्या दिशेने वाटचाल होईल ही आशा.

" राष्ट्रात विचारांचं पीक कस उगवणार?  ." आता त्या दिशेने वाटचाल होईल ही आशा.

          आज संततिनियमनांचं पालन करणारा फक्त बुद्धिजीवी वर्ग आहे. झोपडपट्टीत झुरळ परवडली एवढी पैदास आहे. मुलांचं संगोपन ही बाळंतपणापेक्षा खडतर गोष्ट आहे. ते तप आहे. अपत्याला किमान " रोटी, कपडा, मकान " द्यायला पालक जबाबदार आहेत. हे निर्बुद्ध समाजाला पटवणार सरकार स्वातंत्र्य मिळाल्या पासून देशाला लाभलंच नाही. आपण जसे उघड्यावर, रस्त्यावर झोपतो, तशी आपली असंख्य पोर झोपतील, अशा समाजात, राष्ट्रात विचारांचं पीक कस उगवणार? 

          ध्रुतराष्ट्र जरी आंधळा होता, तरी त्याच्या प्रजेला डोळे होते. इथं कोट्यावधी ध्रुतराष्ट्रावर राज्य करायचं आहे, म्हणजे किती डोळस राज्यकर्ता हवा हे सांगायला हवं का? जन्मान्ध परवडला. सत्ताचं पेलण अशक्य असत. 

वपूर्झा /189/Surendra /24112024


" वृत्ती असली कीं वेळ काढता येतो."

" वृत्ती असली कीं वेळ काढता येतो." 


          एकदा एका प्रश्नाला एक उत्तर दिल कीं संपलं. पण उत्तर मिळालं तरी समाधान मिळत असं नाही. महाभारत, गीता दूर राहू दे. आज तुम्ही आम्ही काय करतो? घरातली एखादी व्यक्ती दीर्घ काळ आजारी असते, तेव्हा आपण वेगळं काय करतो? डॉक्टरांना आपण तेच तेच प्रश्न विचारतो. " Wait and watch " ह्या त्यांच्या उत्तराने आपलं समाधान होत का? संसारातला साथीदार जेव्हा अचानक किंवा दीर्घ आजाराने जातो, तेव्हा त्यांचं आयुष्य संपत आणि मागे राहतो, त्याचा संसार संपतो. त्या अपुऱ्या संसाराची तूट कोणत्या तरी मार्गाने भरून काढण्याची तो केविलवाणी धडपड करतो. "हल्ली आई किंवा बाबा विचित्र वागतात "-- हेच सतत स्वतःच्या संसारात मग्न असलेली मुलं बोलतात. भरून न येणाऱ्या खड्ड्यात आपला बाप किंवा आई जखमी होऊन पडली आहे, हे ते लवकर विसरतात. विधवा आई किंवा विधुर बापाच मानसिक दुःख तर विसराच, पण त्यांच्या शारीरिक व्याधीच नेमक स्वरूप जाणून घ्यायलाही त्यांना सवड नसते. शंका उपस्थित करण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचा काम काही सेकंदाच असत. प्रश्न निवारण्यासाठी वृत्ती लागते. वृत्ती असली कीं वेळ काढता येतो.

 


वपूर्झा /190/Surendra /23112024


शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

" स्त्री " वपूर्झा / 192/Surendra /22112024

"    स्त्री     "


          जगामध्ये स्त्रियांइतक मत्सरी कुणी नसत, असं समाज जातायेता मानत आलाय. हे जितक्या प्रमाणात खरं आहे तितक्याच प्रमाणात तिच्याइतकी सहनशक्तीही पुरुषांजवळ नसते हेही खरं आहे. स्त्री चिवटही असते अन लवचिकही असते. जेवढी नाजूक तेवढी कठोर. जितकी भावनांशील तितकीच उग्र. अन्याय सहन करण्याची तिचाजवळ अफाट ताकद असते. परिवारात आणि समाजात वावरतांना, ज्या अन्यायांना तिला तोड द्यावं लागत तशा अन्यायांना पुरुष सामोरे जाऊ शकणार नाहीत. तिला निसर्गाने अशी धडवलेली आहे, म्हणूनच ती    बाळंतपणाच्या यातनांना सामोरी जाऊ शकते. बाळंतपण हे जस एका जीवाचा जीवनारंभ असतो तसाच कधी कधी तो जन्मदात्रीचा अंतही असतो. मरणाच्या उंबऱ्याला स्पर्श करून मागे येण्याचं सामर्थ्य पुरुषांजवळ असत का?


वपूर्झा / 192/Surendra /22112024


बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

" सोळावं वय धोक्याचं नाही. "

" सोळावं वय धोक्याचं नाही. " 

          सोळावं वय धोक्याचं नाही. ते वय असत चैतन्याचं. सगळ्या जगावर लोभावणार. जास्तीत जास्त निसर्गाजवळ राहणार. झाड, फुल, झरे, डोंगर, आकाश सगळीकडे झेपावणारे ते वय. बुद्धी आणि तर्क तात्पुरतं बाजूला ठेवणार. ते निखळ चैतन्य असत. म्हणून स्वतःच्या अस्तित्वापासून ते सगळ्या विश्वावर लट्टू असत. अंतरभाय्य  प्रेमाच्या त्या राज्यात बुद्धीला जागा नाही. म्हणूनच कोण कुणाला का आवडतो ह्यावर उत्तर नाही. 

वपूर्झा /Surendra /20112024

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

आंधळेपण" वपूर्झा 197/Surendra /19112024

" आंधळेपण" वपूर्झा 197/Surendra /19112024



             जड वस्तूंना पण भावना असतात. सगळं विश्व   त्रिगुणात्मक आहे . रजोगुण, तामोगुणं, सत्वगुण. ह्याबाहेर कुणी जाऊ शकत नाही. आयटॅम  मध्ये सुद्धा प्रोटॉन, इलेक्ट्रोन, न्यूट्रॉन, हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षे एखादा दगड एकाच जागी पडून असतो का? तिथे तामोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःची रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथं तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून आपल्या घरातल फर्निचर आहे तसंच . ती चैतन्याचीच रूप आहेत. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट, दारू ह्यासारखी व्यसन आपण ध्रुतराष्टारासारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या, म्हणजे गंधारीसारखी पट्टी बांधतो. ह्या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे...... असं समजतो. हेच आंधळेपण. विचारहीनता.

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

"संसार - आनंदयात्रा " वपूर्झा 198/Surendra /17112024(2)

"संसार - आनंदयात्रा " वपूर्झा 198/Surendra /17112024(2)

          तुम्ही -आम्ही सगळेच भिकाऱ्यासारखे आहोत. संसार हे आपल्याला ओझं वाटतं. आपण ते कायम डोक्यावर घेतो. म्हणून स्वतःची पत्नी, मुलं, नातेबाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटतं. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घावा तो पालखीसारखा. पालखीतल्या  आराध्य दैवतेच नाव असावं " समर्पण ". त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत कीं संसाराच झंझट झालंच. नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय. आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. मैलाच दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे. बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे ह्याचा इशारा देतात. म्हणूनच संसाराच गाठोडं पायाशी ठेऊन, त्या गाठोड्यावर उभे राहा. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाच दर्शन होत नाही. एकदाच डोक्यावरच गाठोडं खाली ठेवा. त्यांच्यावर उभे राहा. मोकळा श्वास घ्या, म्हणजे स्वतःच अस्तित्व वगळल्यास सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते. कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको, उपदेश नको, म्हणजे प्रवास " झंझट " न वाटता ती आनंदयात्रा ठरेल.

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

" एन्ट्री / एक्स्झिट सगळं अज्ञात " वपूर्झा 199/Surendra /17112024

" एन्ट्री / एक्स्झिट सगळं अज्ञात " वपूर्झा 199/Surendra /17112024



          माणसाला नेमक काय हवयं? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का?  एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मपूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंऱही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या आवाडव्य रंगमंच्यावर आपली " एन्ट्री " मध्येच केव्हातरी होते                 " एक्स्झिटही ". हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही. चाळीसी, पन्नासी, साठी, सत्तरी..... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कीं जन्मानधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार कीं मतिमंद? भूमिकाही माहित नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा किती सांगावं? कृष्णाने बासरीसहित आपल्याला पाठवले, पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. षडरिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वतःला काहीही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

" प्रेम आणि लग्न " वपूर्झा /200/Surendra /14112024(3)

" प्रेम आणि लग्न   " वपूर्झा /200/Surendra /14112024(3)


          कुणावर तरी प्रेम बसणं. त्यानंतर मनात निर्माण होणारी हुरहूर, त्या पाठोपाठ काहूर ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केल म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल ह्या चुकीच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल आहे, तर लग्नासंस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाचं नातं निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधून होतात, अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जात नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहतात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्नसंस्था समाजाने. म्हणूनच अनेक भगिनींच्या पायात समाजाने घातलेल्या बेड्या त्यांना गळ्यात मंगळसूत्र म्हणून बाळगाव्या लागतात. पायातल्याबेड्या थेट गळ्यापर्यंत आल्यावर, न आवडणाऱ्या साथीदाराबरोबर संसार करतांना प्राण कंठाशी का येणार नाहीत? काही काही घरातून ह्या मंगळसूत्राचे गळफास होतात.पण " मरेपर्यंत फाशी " अशी मुक्ती मिळत नाही. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलत आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर मनाचं मिलन होईल ह्याची शास्वती नाही.

" लक्ष्मी आणि ऐपत " वपूर्झा /200/Surendra /14112024(2)

"  लक्ष्मी आणि ऐपत " वपूर्झा /200/Surendra /14112024(2)

          " शुभविवाह " इथंच आम्ही थांबलो आहोत. शुभसंसार ह्याचाशी कितीजणांना कर्तव्य आहे? दोघांपैकी एकाने अरेरावी वाढवायची, दुसऱ्याने सहनशक्ती. आमच्या संसाराला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही. आधुनिक शोधापैकी " कुंकवाच्या टिकल्यांचा शोध "  ज्याने लावला त्याचा खरंतर सत्कार करायला हवा.       " कुंकू " चित्रपटातील कुंकू म्हणजे त्या समाजातली सौभाग्याची खूण, प्रथम बोटावर घेऊन कपाळावर लावली जात असे. कुंकवाची टिकली कंपासने आखल्याप्रमाणे बोटाने बरोबर गोल काही वेळ तरी आरशासमोर जात होता. त्या काही क्षणात कदाचित आत्मवलोकन करण्यासाठी उसंत मिळत होती. आज ही असली भानगड नाही. पर्स मधून सेकंदात टिकली काढली चिकटवली कीं झालं! स्वतःकडच्या टिकल्या संपल्या कीं मैत्रणीकडून घ्यायच्या. न टिकणाऱ्या वस्तूलाच टिकली म्हणायचं हे " नांदा सौख्यभरे " ह्या आशीर्वादाच विडंबन आहे.


          कसही वागलं तरी चालत, हे एकदा ठरवले कीं झालं. स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला कीं संसाराच तंत्र कोण बघतो? बायकोला यंत्र्यासारखी राबवायची. ती जाते कुठे? नवऱ्याला सोडेल, पण मुलांच्या बेड्या पायात अडकवल्या कीं कुठं पळेल? 


          काही संसार पाहिले कीं वाटतं, हे सुबत्तेच आणि रिकामपणच लक्षण. ह्या सर्व महाभागंना लक्ष्मीचा विनियोग आणखी योग्य कारणासाठी करता आला नसता का? -अर्थात लक्ष्मीबारोबर त्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. पैशाचा प्रश्न सुटलाकी, आयुष्य खूप सोपं होत, ह्यात वादच नाही, पण तो वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात चांगला सुटलाकी ही चित्र दिसतात. लक्ष्मी आणि ऐपत ह्यांचा ह्यापेक्षा वेगळा उपमर्द आणखी कोणता असेल? 

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

"संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद. " वपूर्झा /201/Surendra /14112024

     

"संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद.  " वपूर्झा /201/Surendra /14112024

     सहवासाने प्रेम निर्माण होत -असं सांगणाऱ्या परिवाराला लहानपनापासून सहवास लाभलेल्या बहीणभावांडात प्रेम का नाही, ह्याच उत्तर शोधायची गरजवाटत नाही. टेबल आणि खुर्ची कायम एकमेकांच्चा जवळ असते म्हणून त्यांच्यात प्रेम आहे असं समजायचं का? टेबलाची उंची कायमच खुर्चीपेक्षा  जास्त असते आणि हवी. म्हणून ते पहिल्यापासूनच ',  चढून ' बसलेलं, स्वतःला वरच्या लेवलच मानणार. त्याला खुर्चीच्या यातना समजतील का? खुर्चीची वेगळीच तऱ्हा. खुर्ची हे अहंकाराचच प्रतीक आहे सामान्यताला सामान्य माणसालाही ती कोणता दर्जा देईल ह्याचा भरवसा नाही. ती समाज कंटाकाचाही समाजसेवक बनवते. ह्यातला सेवक शब्दही चुकीचा आहे. मुळच्या हिंसक वृत्तीला खुर्ची राजाश्रय देते आणि विचारवंतांना तिचा सेवक व्हावे लागत. संवेदनाच जाणून घ्यायच्या असतील तर खुर्ची आणि टेबल समान पातळीवर हवीत. पण खुर्ची आणि टेबल हा आहे व्यवहार. समान पातळी म्हटलं कीं भारतीय बैठक हवी. तिसुद्धा समाजात रूढ झालेली आहे. पण पुन्हा भारतीय बैठक म्हणजे समान विचारांची बैठक नव्हे. म्हणूनच संसाराचा प्रवास डबल बेड पासून सुरु होतो आणि टेबल खुर्चीपाशी येऊन थांबतो. डबलबेड आहे म्हणून मन एकरूप होतील का? हे पाहण्याची गरजही कुणाला वाटतं नाही. मंद प्रकाश देणारा नाईट लॅम्प लावायचा. तो स्वच्छ प्रकाशातला पशु दिसेनासा व्हावा म्हणून. म्हणजे " मरेपर्यंत फाशी ", पण सकाळी आयता चहाचा ट्रे समोर करायला पत्नी हयात. कोणत्याही मुलीने स्वप्नाळू राहता कामा नये. कवितेचा छन्द सोडून तिने व्याकरण शिकावं. संसार म्हणजे व्याकरण. व्याकरणात पद कशी चालवावीत हे शिकवतात. संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद.

 

        

" तिसरा उंबरा " वपूर्झा /202/Surendra /13112024

 "  तिसरा उंबरा  " वपूर्झा /202/Surendra /13112024


            घटस्फोटच्या उंबऱ्यापाशी अनेक संसार थांबलेले आहेत. माहेरचा उंबराठा ओलांडतांना मन कितीही कावरबावर झालेलं असलं तरीही दुसरा उंबरा स्वागत करण्याकरिता आतुर झालेला असतो. सासरचा तो उंबरा अनेकजणींना ओलांडता येत नाही. करणं त्यानंतर स्वागत करण्या करीता तिसरा उंबरा नसतो. पुणे -मुंबई शहरात माझ्यासारख्या शिकलेल्या, माझ्याहून देखण्या, योग्य सन्मान मिळाला तर कोणतंही क्षेत्र गाजवणाऱ्या अश्या अनेक गृहिणी, तिसरा उंबरा न लाभल्याने, दुसऱ्या उंबऱ्याच्या आतच, झिजून झिजून आयुष्य घालवतात. पहिला उंबरा ओलांडतांना स्वतःच बळ जास्त वापराव लागत नाही. सगळ्या शरीरात पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या उतरतात. समुद्राची ओढचं जबरदस्त असते. हा पहिला उंबरा ओलांडला कीं तो त्या क्षणी  " माहेरचा उंबराठा " होतो. नद्या कितीही गोड असल्या तरीही समुद्राच खारेपण त्यांच्यात उतरतच. सगळ्या निसर्गाच माधुर्य चाखत, त्याचा स्वीकार करीत नद्या वाहतात. समुद्र एकाच जागी राहून राहून खारट होतो. सगळ्या नद्याचं माधुर्य लाभुनही त्याचा खारटपणा जात नाही. तरीही, अनेकजणींना ते खारट जहर सोसावं लागत. आयुष्यभर का? तर तो उंबराठा ओलांडल्यावर स्वागत करायला त्यांना मिळत नाही तो तिसरा उंबरा.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

वपूर्झा / 205/12112024

शत्रूची व्याख्या काय?


          शतृत्व पैदा होण्यासाठी प्रथम परिचय हवा. त्याच मैत्रीत रूपांतर व्हायला हवं. मग केव्हातरी किरकोळ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून, मतभेद किंवा ' अतिपरिचात अवंज्ञा ' असे शत्रूत्वाचे टप्पे असतात. 

***********************************************


प्रेम 

          प्रेम हा मनाचा हुंकार असतो. बुद्धी, तर्क, दूरदृष्टी ह्या गोष्टींना इथे थारा नाही. तो हिशोब झाला. दुकानातली अनावश्यक पण देखणी, मोहात पाडणारी वस्तू पाहताक्षणी ' पॅक करा ' असं आपण म्हणतो तेव्हा ऐपत, त्याहीपेक्षा, ' ह्याची आपल्याला गरज आहे का? ' हा विचार आला कीं संपलं. साध्या वस्तूच्या खरेदीच्या बाबतीत आपण पैसे उधळतो तेव्हा त्यातली साठ टक्के किमत आपल्या टेम्पटेंशनचीं असते.


***********************************************


वपूर्झा / 205/12112024

वपूर्झा -206/सुरेंद्र

विश्वासू ट्रस्टी/वपूर्झा -206/सुरेंद्र /11112024


    स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरशाईतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं. त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पहायची. आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही. मग खरं मन प्रकट होत. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली पहायच.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

विचार म्हणजे तरी नक्की काय? / 


          कितीही विचारी विचारी माणूस म्हटलं तरी एका ठराविक सीमेलीकडे विचार करू शकत नाही. विचार म्हणजे तरी नक्की काय? सत्तर ते ऐशी टक्के माणसं निव्वळ नित्याच आयुष्य जगतात. संपूर्ण दिवसाचा दिनक्रमच तुमच्या हालचाली ठरवतो असं नाही, तर विचारांची दिशाही ठरवतो. सकाळचा चहा, दाढी, आंघोळ, मुंबईच्या माणसांच्या बाबतीत नेहमीची गाडी पकडणं, ह्यासारख्या गोष्टीत विचारांना थाराचं नाही. रीत म्हटली कीं विचारातून मेंदू मुक्त. काहीतरी ' विपरीत ' करायचं असलं म्हणजेच विचार करावा लागतो. काही समस्या सल्लामसलतीने सोडवता येतात. ते सल्ले आपण ऐकतोच असं नाही. ऐकायचं बंधन नसल्यामुळेच आपण सल्ले मागत फिरतो आणि अनेकांचे डोकं उठवतो.. विचारणाऱ्याचा गोंधळ वाढतो. सल्ला देणाऱ्यांचा अहंकार. (वपूर्झा -208)


विश्वासू ट्रस्टी/वपूर्झा -206/सुरेंद्र /11112024

विश्वासू ट्रस्टी/वपूर्झा -206/सुरेंद्र /11112024


    स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरशाईतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं. त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पहायची. आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही. मग खरं मन प्रकट होत. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली पहायच.

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

विचार म्हणजे तरी नक्की काय / वपूर्झा -208

विचार म्हणजे तरी नक्की काय / वपूर्झा -208


          कितीही विचारी विचारी माणूस म्हटलं तरी एका ठराविक सीमेलीकडे विचार करू शकत नाही. विचार म्हणजे तरी नक्की काय? सत्तर ते ऐशी टक्के माणसं निव्वळ नित्याच आयुष्य जगतात. संपूर्ण दिवसाचा दिनक्रमच तुमच्या हालचाली ठरवतो असं नाही, तर विचारांची दिशाही ठरवतो. सकाळचा चहा, दाढी, आंघोळ, मुंबईच्या माणसांच्या बाबतीत नेहमीची गाडी पकडणं, ह्यासारख्या गोष्टीत विचारांना थाराचं नाही. रीत म्हटली कीं विचारातून मेंदू मुक्त. काहीतरी ' विपरीत ' करायचं असलं म्हणजेच विचार करावा लागतो. काही समस्या सल्लामसलतीने सोडवता येतात. ते सल्ले आपण ऐकतोच असं नाही. ऐकायचं बंधन नसल्यामुळेच आपण सल्ले मागत फिरतो आणि अनेकांचे डोकं उठवतो.. विचारणाऱ्याचा गोंधळ वाढतो. सल्ला देणाऱ्यांचा अहंकार.

संसार 10.11.2004

  संसार 10.11.2004



           हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याच टेक्स्ट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही, डिग्री नाही. डिप्लोमा नाही, गाईड नाही. आपण एका न संपणाऱ्या कोर्स ला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कस होणार? सगळ्या कुटुंबातून पतीपत्नी परीक्षिकाप्रमाणे एकमेकांची गंमत बघत राहतात. कोण कस चुकत. मग मीही कशी जिरवतो किंवा जिरवते ते पहा. सगळी कडे एकच. आजपासून आपल्यापूरत हे बंद. संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल. ऐनवेळी. अगोदर न फुटणारी. ती दोघांनी सोडवायची. ह्याच एका कोर्समध्ये पेपर सोडवतांना कॉपी करायची परवानगी आहे '

     

          आपला प्रत्येक श्वास जसा वर्माणकाळातल्या ताज्या क्षणांशी इमानाने नातं ठेवतो, तितक्याच वृत्ती कोऱ्या ठेऊन, संसारातला प्रत्येक क्षण जोखायचा. भूत, भविष्याची वजन वापरून वर्तमानकाळातला कोणताही क्षण तोलता येत नाही. पाच पंचेंद्रिये आणि ज्ञानेद्रिये हीच मोजमाप.


          Nobody is perfect हे सूत्र मनात हवं. शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगल चांगल करण्यावागण्याची इच्छा असूनही, मधल्या Steps चुकू शकतात, ह्यावर श्रद्धा असावी.


          Who is wrong ह्याऐवजी What is wrong याचाच शोध घ्यायचं दोधांनी ठरवलंतर तर संसार बहरलाच पाहिजे.


          तुमच्या भाषेत सांगायचं तर, सरळ पायऱ्या चढून शिखर गाठण म्हणजे Who is wrong च्या मळलेल्या पायवाटेवरून जाण.


          What is wrong चा शोध घेणं म्हणजे ट्रॅकिंग अखंड चालो.

(वपूर्झा/व. पु. काळे /208/209)

गुरुवार, १४ मार्च, २०२४

लेखक:- सुरेंद्र पाथरकर अभिवाचक:- अंजना लगस. " अंतिम लढत" हे मी लिहिलेले पुस्तक नसून "कथा" आहे. कोल्हापूरचा एक युवक विपरीत परिस्थितीत शिकून इंजिनिअर होतो. जॉब साठी अनेक अडचणीतून जावे लागते. अखेर सैन्य भरतीत सेलेक्शन होते, मग कठोर ट्रेनिंग होते. दरम्यान त्याचे प्रेम प्रकरण. बॉर्डर वर नियुक्ती झाल्यावर अनेक सिक्रेट जबाबदाऱ्या पार पाडतो. पण प्रेम मनापासून केले असते ते तो विसरू शकत नाही. त्याची प्रेमिका त्याचीच वाट पहात हॉस्पिटल मधे हेड नर्स म्हणून काम करत असते व वृध्द आईचा सांभाळ करत असते. सैन्यात त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो. त्याला हॉस्पिटल केले जाते. प्रेमिके ची भेट होते. भारताच्या पंतप्रधानां कडून सर्वोच्य शौर्य पुरस्कार दिला जातो. लहान भाऊ पण सैन्यात भरती होतो. तरुणांसाठी मार्गदर्शक कथा. लाखो रुपयांची डोनेशन देऊन डॉक्टर, इंजिनिअर खूप पैसे कमवायचे स्वप्न बघण्या पेक्षा सैन्यात भरती होऊन भारतमातेची सेवा करावी हा संदेश.

https://youtu.be/HllTGqzy-Pw?si=DqELeZpafnWlLDXK


मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

रविवार, २१ जानेवारी, २०२४