" गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही. "
000o000
धोबीघाटावर धबाधबा कपडे आपटणाऱ्या एखाद्या धोब्यापेक्षा क्राइम ब्रांचचा ऑफिसर वेगळा असायला हवा. धोबिघाटापेक्षा खुबीघाटावर समोरच्या माणसाला बोलत करायला हवं. मार खाण, हा त्या लोकांचं प्रारंभी अनुभवाचा, मग सवयीचा आणि शेवटी व्यसनाचा भाग होतो. मार देणाऱ्या माणसालाही कमी कष्ट होत नाहीत. सारखी संतापण्याची सवय लागते. तेव्हा मार खाऊन वठणीवर येणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हळू हळू कमी होते. ह्यापेक्षा मनाला हात घाला. पोलिसी व्यवसाय दंडूक्यापेक्षा बुद्धीने करा. समोरच्या माणसाचं बलस्थान शोधण्यापेक्षा, तो दुर्बल कशाने होतो ते जाणून घ्या. प्रहार तिथे करा. त्याला मारझोड करण म्हणजे त्याच्या बलस्थानाशी झुंज देण्यासारखे आहे. मारलं की गुन्हा कबूल केला जातो, हा एकच नियम जर आयुष्यभर सांभाळलात, तर तुमच्याही बुद्धीची वाढ होणार नाही. फक्त झोडपून काढून प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर चार पैलवान नेमून काम भागल असत. गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही.
वपूर्झा / 105/Surendra /2212024(२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा