".स्वतःच्याच सावलीवर जो भाळला , तो फसला. ".
000o00oo
' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वापरायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्यांचं ' हरवण, सापडण, हुरहूर वाटण ' हे सगळ भावविश्व स्वतंत्र असत. या अनंत प्रवासात कितीतरी मित्र भेटतात. ' या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' अस वाटायला लावणारी अनेक माणस, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. ' जगावं, अस काहीतरी एक आहे ' अस वाटायला लावतात. काही काही जणांना एका ठराविक हॉटेलमधल जेवण आवडत. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीत घडत. स्वतःच्याच सावलीवर जो भाळला , तो फसला.
वपूर्झा / 172 /Surendra /04122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा