" सोळावं वय धोक्याचं नाही. "
सोळावं वय धोक्याचं नाही. ते वय असत चैतन्याचं. सगळ्या जगावर लोभावणार. जास्तीत जास्त निसर्गाजवळ राहणार. झाड, फुल, झरे, डोंगर, आकाश सगळीकडे झेपावणारे ते वय. बुद्धी आणि तर्क तात्पुरतं बाजूला ठेवणार. ते निखळ चैतन्य असत. म्हणून स्वतःच्या अस्तित्वापासून ते सगळ्या विश्वावर लट्टू असत. अंतरभाय्य प्रेमाच्या त्या राज्यात बुद्धीला जागा नाही. म्हणूनच कोण कुणाला का आवडतो ह्यावर उत्तर नाही.
वपूर्झा /Surendra /20112024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा