" आंधळेपण" वपूर्झा 197/Surendra /19112024
जड वस्तूंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे . रजोगुण, तामोगुणं, सत्वगुण. ह्याबाहेर कुणी जाऊ शकत नाही. आयटॅम मध्ये सुद्धा प्रोटॉन, इलेक्ट्रोन, न्यूट्रॉन, हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षे एखादा दगड एकाच जागी पडून असतो का? तिथे तामोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःची रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथं तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून आपल्या घरातल फर्निचर आहे तसंच . ती चैतन्याचीच रूप आहेत. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट, दारू ह्यासारखी व्यसन आपण ध्रुतराष्टारासारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या, म्हणजे गंधारीसारखी पट्टी बांधतो. ह्या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे...... असं समजतो. हेच आंधळेपण. विचारहीनता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा