" संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? ."
000o000
काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तुला विसंवादाची वाळवी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतय. इतक्या झपाट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगाच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगल पत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगलपत्रिकेगणिक गणपतीबाप्पा नाविन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्या पेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पौरोहित्य करणाऱ्या गुरुजिंपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंसंकारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धिवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याच हे विदारक उदाहरण. खर तर सगळ्या मंगळकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत. ' श्रृती मंगल थिएटर ' , ' आनंद थिएटर ' अस म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटणच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो?
वपूर्झा / 153/Surendra /07122024(2).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा