"संसार क्रिकेट सारखा असतो ."
000o000
" पारितोषिक, प्रशस्तिपत्रक, कप , पेले ,सुवर्णपदक," म्हणजे ' यश ' नव्हे . ती ' किर्ती ' . यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, स्वाशाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेट समोर उभ राहिल की प्रत्येक बॉलच काहीतरी करावं लागत. ' भूत, वर्तमान, भविष्य म्हंजे तीन स्टॅम्पस ' अस एक क्रिकेटीयर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणे, थांबवणं, टोलवण यापैकी काहीतरी एक करावच लागत. तुम्ही जर बॉलर्स एंडला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळाप्रमाणे इथ पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये, म्हणून जपायच असत. साथीदाराशीच स्पर्धा केलीत तर कदाचित आपल्याला
पॅव्हिलियन मध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडू बरोबर खेळताना पाहावं लागेल.
वपूर्झा / 146/Surendra /12122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा