शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

" यश म्हणजे तरी काय ?."

"    यश म्हणजे तरी काय ?."

                           000o000

               यश म्हणजे तरी काय ?  यश म्हणजे प्रकाश. प्रकाश असतो तरी किंवा नसतो तरी, पण दोन्हीं अवस्थेत त्याच्या.   प्रभावाच किंवा अभवाचं अस्तित्व मानावच लागत. तीच गोष्ट यशाची. त्यामुळे शिखरापाशी पोचलेला हा यशस्वी असतोच, पण त्याच वेळेला मिळालेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी तितकेच लहान - मोठे खड्डेही ह्याच वाटचालीत निर्माण झालेले असतात, आणि उंचावरून ज्याचे त्याला हे खड्डे, ह्या दऱ्या जास्त ठळकपणे जाणवतात. ह्या वाटचालीतले काही खड्डे काही व्यक्तींना पटकन दिसतात. त्यातही बायको ही पहिली व्यक्ती. तिला नवऱ्याच्या यशाच्या शिखराअगोदर खड्डेच प्रथम दिसतात. ह्यात तिची चूक नाही. कारण ती त्यांचं दुसरं चाक. तिला त्या खड्यांचे शारीरिक, मानसिक,आर्थिक, लौकिक हादरे जास्त बसतात. ह्या हादऱ्याबरोबरच नवऱ्याकडे कुणी बोटं उगारता कामा नये, हा तिने स्वतःच घालून घेतलेला दंडक असतो. सवलत वा संशयाचा फायदा ती तिच्या कोर्टातल्या आरोपीला द्यायला तयार नसते. तिची ती भूमिका योग्य असते. कारण ज्योत जळून तेजोमय ठरते, संमई नुसतीच तापत राहते.        

वपूर्झा / 138/Surendra /15122024

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा