" हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे. ."
000o000
गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असत. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असत. कामाचं त्रैराशिक आठ तासांच्या पाढयांवर आखलेल असत, सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची वेसण सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकूमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्याउलट कामाचं नातं भक्तिशी जडल तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणींवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाहीत अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात. सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्याउलट विश्वास, प्रेम वात्सल्य ह्यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात. टवटवीत असतात. हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे.
वपूर्झा / 149/Surendra /08122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा