रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

संसार 10.11.2004

  संसार 10.11.2004



           हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याच टेक्स्ट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही, डिग्री नाही. डिप्लोमा नाही, गाईड नाही. आपण एका न संपणाऱ्या कोर्स ला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कस होणार? सगळ्या कुटुंबातून पतीपत्नी परीक्षिकाप्रमाणे एकमेकांची गंमत बघत राहतात. कोण कस चुकत. मग मीही कशी जिरवतो किंवा जिरवते ते पहा. सगळी कडे एकच. आजपासून आपल्यापूरत हे बंद. संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल. ऐनवेळी. अगोदर न फुटणारी. ती दोघांनी सोडवायची. ह्याच एका कोर्समध्ये पेपर सोडवतांना कॉपी करायची परवानगी आहे '

     

          आपला प्रत्येक श्वास जसा वर्माणकाळातल्या ताज्या क्षणांशी इमानाने नातं ठेवतो, तितक्याच वृत्ती कोऱ्या ठेऊन, संसारातला प्रत्येक क्षण जोखायचा. भूत, भविष्याची वजन वापरून वर्तमानकाळातला कोणताही क्षण तोलता येत नाही. पाच पंचेंद्रिये आणि ज्ञानेद्रिये हीच मोजमाप.


          Nobody is perfect हे सूत्र मनात हवं. शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगल चांगल करण्यावागण्याची इच्छा असूनही, मधल्या Steps चुकू शकतात, ह्यावर श्रद्धा असावी.


          Who is wrong ह्याऐवजी What is wrong याचाच शोध घ्यायचं दोधांनी ठरवलंतर तर संसार बहरलाच पाहिजे.


          तुमच्या भाषेत सांगायचं तर, सरळ पायऱ्या चढून शिखर गाठण म्हणजे Who is wrong च्या मळलेल्या पायवाटेवरून जाण.


          What is wrong चा शोध घेणं म्हणजे ट्रॅकिंग अखंड चालो.

(वपूर्झा/व. पु. काळे /208/209)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा