बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

"संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद. " वपूर्झा /201/Surendra /14112024

     

"संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद.  " वपूर्झा /201/Surendra /14112024

     सहवासाने प्रेम निर्माण होत -असं सांगणाऱ्या परिवाराला लहानपनापासून सहवास लाभलेल्या बहीणभावांडात प्रेम का नाही, ह्याच उत्तर शोधायची गरजवाटत नाही. टेबल आणि खुर्ची कायम एकमेकांच्चा जवळ असते म्हणून त्यांच्यात प्रेम आहे असं समजायचं का? टेबलाची उंची कायमच खुर्चीपेक्षा  जास्त असते आणि हवी. म्हणून ते पहिल्यापासूनच ',  चढून ' बसलेलं, स्वतःला वरच्या लेवलच मानणार. त्याला खुर्चीच्या यातना समजतील का? खुर्चीची वेगळीच तऱ्हा. खुर्ची हे अहंकाराचच प्रतीक आहे सामान्यताला सामान्य माणसालाही ती कोणता दर्जा देईल ह्याचा भरवसा नाही. ती समाज कंटाकाचाही समाजसेवक बनवते. ह्यातला सेवक शब्दही चुकीचा आहे. मुळच्या हिंसक वृत्तीला खुर्ची राजाश्रय देते आणि विचारवंतांना तिचा सेवक व्हावे लागत. संवेदनाच जाणून घ्यायच्या असतील तर खुर्ची आणि टेबल समान पातळीवर हवीत. पण खुर्ची आणि टेबल हा आहे व्यवहार. समान पातळी म्हटलं कीं भारतीय बैठक हवी. तिसुद्धा समाजात रूढ झालेली आहे. पण पुन्हा भारतीय बैठक म्हणजे समान विचारांची बैठक नव्हे. म्हणूनच संसाराचा प्रवास डबल बेड पासून सुरु होतो आणि टेबल खुर्चीपाशी येऊन थांबतो. डबलबेड आहे म्हणून मन एकरूप होतील का? हे पाहण्याची गरजही कुणाला वाटतं नाही. मंद प्रकाश देणारा नाईट लॅम्प लावायचा. तो स्वच्छ प्रकाशातला पशु दिसेनासा व्हावा म्हणून. म्हणजे " मरेपर्यंत फाशी ", पण सकाळी आयता चहाचा ट्रे समोर करायला पत्नी हयात. कोणत्याही मुलीने स्वप्नाळू राहता कामा नये. कवितेचा छन्द सोडून तिने व्याकरण शिकावं. संसार म्हणजे व्याकरण. व्याकरणात पद कशी चालवावीत हे शिकवतात. संसारात वेगवेगळी पद नाहीतच. पत्नीपद आणि मातृपद.

 

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा