सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

वपूर्झा -206/सुरेंद्र

विश्वासू ट्रस्टी/वपूर्झा -206/सुरेंद्र /11112024


    स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरशाईतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं. त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पहायची. आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही. मग खरं मन प्रकट होत. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली पहायच.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

विचार म्हणजे तरी नक्की काय? / 


          कितीही विचारी विचारी माणूस म्हटलं तरी एका ठराविक सीमेलीकडे विचार करू शकत नाही. विचार म्हणजे तरी नक्की काय? सत्तर ते ऐशी टक्के माणसं निव्वळ नित्याच आयुष्य जगतात. संपूर्ण दिवसाचा दिनक्रमच तुमच्या हालचाली ठरवतो असं नाही, तर विचारांची दिशाही ठरवतो. सकाळचा चहा, दाढी, आंघोळ, मुंबईच्या माणसांच्या बाबतीत नेहमीची गाडी पकडणं, ह्यासारख्या गोष्टीत विचारांना थाराचं नाही. रीत म्हटली कीं विचारातून मेंदू मुक्त. काहीतरी ' विपरीत ' करायचं असलं म्हणजेच विचार करावा लागतो. काही समस्या सल्लामसलतीने सोडवता येतात. ते सल्ले आपण ऐकतोच असं नाही. ऐकायचं बंधन नसल्यामुळेच आपण सल्ले मागत फिरतो आणि अनेकांचे डोकं उठवतो.. विचारणाऱ्याचा गोंधळ वाढतो. सल्ला देणाऱ्यांचा अहंकार. (वपूर्झा -208)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा