" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! "
Ooo0oo0
खोटं बोलण हे एकदा रक्तात मुरलं, हाड -मांस -मज्या - रक्तवाहिन्यांप्रमाणे " ॲनाटॉमी "चाच एक भाग झालं कीं, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करतांना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो.
' माझ्या जिवाची सगळी लावतोड तुमच्यासाठी होत आहे, ह्याचा तुम्हाला पत्ता तरी आहे का? हे सगळं चाललंय ते कुणासाठी?' असा प्रश्न घरोघरी बायका आपल्या नवऱ्यांना विचारतात.
त्याप्रमाणे, ' दिवसभर नोकरीं करतोय, त्याशिवाय ब्रोकरच काम करतोय किंवा पार्टटाइम जॉब करतोय, क्लासेस चालवतोय. ही सगळी धडपड कुणासाठी करतोय? रक्ताचं पाणी करतोय ' असली विधाने नवरेही करतात.
हा सगळा बकवास आहे. रक्ताचं खरोखरचं पाण्यात रूपांतर झालं, तर ते रक्तदानच. प्रत्येकजण जाता -येता RBC /WHC /टोटल काऊंटच्या तपासण्या करून घेईन. बायकोसाठी जीव गहाण ठेवणाऱ्या नवऱ्यापासून, त्याच्या बायकोने घटस्फोटहे. मागितला तर?
' आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! ' हे नारदानच वचनच खरं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून वाढण्यात जोपर्यंत पत्नीला आनंद आहे, तोपर्यंतच ती तो पदार्थ करते. एकूण एक नात्याच्या, मित्रांच्या बाबतीत हे एकमेव सत्य आहे.
वपूर्झा / 173 /Surendra /03122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा