"संसार - आनंदयात्रा " वपूर्झा 198/Surendra /17112024(2)
तुम्ही -आम्ही सगळेच भिकाऱ्यासारखे आहोत. संसार हे आपल्याला ओझं वाटतं. आपण ते कायम डोक्यावर घेतो. म्हणून स्वतःची पत्नी, मुलं, नातेबाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटतं. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घावा तो पालखीसारखा. पालखीतल्या आराध्य दैवतेच नाव असावं " समर्पण ". त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत कीं संसाराच झंझट झालंच. नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय. आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. मैलाच दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे. बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे ह्याचा इशारा देतात. म्हणूनच संसाराच गाठोडं पायाशी ठेऊन, त्या गाठोड्यावर उभे राहा. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाच दर्शन होत नाही. एकदाच डोक्यावरच गाठोडं खाली ठेवा. त्यांच्यावर उभे राहा. मोकळा श्वास घ्या, म्हणजे स्वतःच अस्तित्व वगळल्यास सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते. कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको, उपदेश नको, म्हणजे प्रवास " झंझट " न वाटता ती आनंदयात्रा ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा