" योग्य वेळेची वाट पहा " असं म्हणणं काय किंवा पेशन्टला डॉक्टरांनी " वेट अँड वॉच " म्हणणं काय, सारखाच! ."
000o000
काहींना काही अपेक्षा बाळगून जी माणसं गुरु शोधतात, त्या सगळ्यांना "निरपेक्षेत आनंद आहे " हा सल्ला कसा मानवेल? साध्या नोकरीतही, शुद्ध व्यावहारिक पातळीवर, आपल्या जवळ पात्रता आहे अशा माणसांना प्रमोशनच हवं असत. ती निव्वळ व्याहारिक गरज नसते. आपल्या शिक्षणाच यथायोग्य मूल्यमापन व्हावं आणि त्या शिक्षणाचा गौरव व्हावा ही रास्त मागणी असते. नोकरीतल्या प्रथेप्रमाणे " सिनियरिटी " साठी थांबायची पाळी आली म्हणजे, एक्सप्रेस गाड्यांनी यार्डात पडून राहायचं आणि मालगाडयांनी पूढे जायचं, हे शल्य सोसत नाही. काही काही डब्यातून तर मालही नसतो, तरी ते खडखडत पुढे जातात आणि लायक माणसांना रखडवतात. रिकामा डबा आपल्या हिमतीवर कुठलाच प्रवास करू शकत नाही. हे डबे कुणाच्या ना कुणाच्या कृपेवरच पुढे होतात. लायकमाणसाने कितीही दरवाजे ठोठावले तरीही आतली कडी निघतं नाही. बंद दरवाज्यांची एकजूट झटकन होते. कारण त्या दरवाज्यांच्या पल्याड भ्याड माणसांची धरं असतात. उघडा दरवाजा सगळ्यांचच स्वागत करतो. नोकरीं करणाऱ्या माणसाचं सत्तर टक्के आयुष्य उघड्या दरवाज्याच्या शोधामध्ये जात. बंद दरवाज्यांना दार ठोठावणाऱ्याची लायकी किंवा योग्यता कशी कळणार? अशा माणसांना ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी " माझं लक्ष आहे. योग्य वेळेची वाट पहा " असं म्हणणं काय किंवा पेशन्टला डॉक्टरांनी " वेट अँड वॉच " म्हणणं काय, सारखाच!
वपूर्झा /188/Surendra /25112024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा