"होणाऱ्या किंवा नवविवाहित वधुवरांसाठी महत्वाची टीप"
000o000
अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे.
अ : अर्पण भाव. क्ष : क्षमाशीलता. ता : तारतम्य.
हे तीन गुण दोघांजवळ हवेत.
प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यावरच्या पट्ट्या उतराव्यात.
एकमेकांच्या वृत्त्तींचा खरा मागोवा घ्यावा. सप्तकातले किती सुर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासाव. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना मुरड घालू शकणार आहोत, त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालण हा सहजधर्म व्हायला हवा . कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकंण ह्यालाच अर्पणभाव म्हणतात
स्वतःतल्या उणीवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता.
तरतमभाव न बाळगता घ्यायचं कस आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि वाकवायला,स्थळ,काळ,स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य.
वपूर्झा / 142/Surendra /13122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा