" संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग."
000o000
गुलामगिरीत आयुष्य काढायचं म्हणजे डझनाच्या हिशोबानेच मुलं हवीत अस नाही. पाळणा एकदा हलला तरी पुरतो. पाळणा मुळीच हलला नाही तरी तुरुंग चुकत नाही. नवरा असतोच.
तो बांधलेला असूनही मोकळा. बाई कायम बंदिवान. म्हणूनच, लग्न न करणाऱ्या बाईबद्दल कुचेस्टेने बोलल्याशिवाय त्यांना त्यांच्या पायातल्या बेड्या हलक्या वाटत नाहीत. संसार कसाही असला, नवरा कितीही विक्षिप्त असला तरी उभ्या आयुष्याचं सार्थक, कपाळावरच्या टिकलीच्या आकाराच होत.
संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग. कारण या तुरुंगातले कैदी, इतर मोकळी माणस कैदी कधी होतील ह्याची वाट बघत असतात. तुरुंगाच्या कोठड्या जास्तीत जास्त शोभिवंत करतात. आपल्या किती पिढ्या ह्या अशाच तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगून नांदल्या ह्याच्या कहाण्या सांगतात. लग्न न करण हाच गुन्हा असतो हे कोठडी - कोठडीतील गुन्हेगार आपापल्या मुलांना सांगतात.
वपूर्झा / 139/Surendra /14122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा