" लक्ष्मी आणि ऐपत " वपूर्झा /200/Surendra /14112024(2)
" शुभविवाह " इथंच आम्ही थांबलो आहोत. शुभसंसार ह्याचाशी कितीजणांना कर्तव्य आहे? दोघांपैकी एकाने अरेरावी वाढवायची, दुसऱ्याने सहनशक्ती. आमच्या संसाराला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही. आधुनिक शोधापैकी " कुंकवाच्या टिकल्यांचा शोध " ज्याने लावला त्याचा खरंतर सत्कार करायला हवा. " कुंकू " चित्रपटातील कुंकू म्हणजे त्या समाजातली सौभाग्याची खूण, प्रथम बोटावर घेऊन कपाळावर लावली जात असे. कुंकवाची टिकली कंपासने आखल्याप्रमाणे बोटाने बरोबर गोल काही वेळ तरी आरशासमोर जात होता. त्या काही क्षणात कदाचित आत्मवलोकन करण्यासाठी उसंत मिळत होती. आज ही असली भानगड नाही. पर्स मधून सेकंदात टिकली काढली चिकटवली कीं झालं! स्वतःकडच्या टिकल्या संपल्या कीं मैत्रणीकडून घ्यायच्या. न टिकणाऱ्या वस्तूलाच टिकली म्हणायचं हे " नांदा सौख्यभरे " ह्या आशीर्वादाच विडंबन आहे.
कसही वागलं तरी चालत, हे एकदा ठरवले कीं झालं. स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला कीं संसाराच तंत्र कोण बघतो? बायकोला यंत्र्यासारखी राबवायची. ती जाते कुठे? नवऱ्याला सोडेल, पण मुलांच्या बेड्या पायात अडकवल्या कीं कुठं पळेल?
काही संसार पाहिले कीं वाटतं, हे सुबत्तेच आणि रिकामपणच लक्षण. ह्या सर्व महाभागंना लक्ष्मीचा विनियोग आणखी योग्य कारणासाठी करता आला नसता का? -अर्थात लक्ष्मीबारोबर त्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. पैशाचा प्रश्न सुटलाकी, आयुष्य खूप सोपं होत, ह्यात वादच नाही, पण तो वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात चांगला सुटलाकी ही चित्र दिसतात. लक्ष्मी आणि ऐपत ह्यांचा ह्यापेक्षा वेगळा उपमर्द आणखी कोणता असेल?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा