" वृत्ती असली कीं वेळ काढता येतो."
एकदा एका प्रश्नाला एक उत्तर दिल कीं संपलं. पण उत्तर मिळालं तरी समाधान मिळत असं नाही. महाभारत, गीता दूर राहू दे. आज तुम्ही आम्ही काय करतो? घरातली एखादी व्यक्ती दीर्घ काळ आजारी असते, तेव्हा आपण वेगळं काय करतो? डॉक्टरांना आपण तेच तेच प्रश्न विचारतो. " Wait and watch " ह्या त्यांच्या उत्तराने आपलं समाधान होत का? संसारातला साथीदार जेव्हा अचानक किंवा दीर्घ आजाराने जातो, तेव्हा त्यांचं आयुष्य संपत आणि मागे राहतो, त्याचा संसार संपतो. त्या अपुऱ्या संसाराची तूट कोणत्या तरी मार्गाने भरून काढण्याची तो केविलवाणी धडपड करतो. "हल्ली आई किंवा बाबा विचित्र वागतात "-- हेच सतत स्वतःच्या संसारात मग्न असलेली मुलं बोलतात. भरून न येणाऱ्या खड्ड्यात आपला बाप किंवा आई जखमी होऊन पडली आहे, हे ते लवकर विसरतात. विधवा आई किंवा विधुर बापाच मानसिक दुःख तर विसराच, पण त्यांच्या शारीरिक व्याधीच नेमक स्वरूप जाणून घ्यायलाही त्यांना सवड नसते. शंका उपस्थित करण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचा काम काही सेकंदाच असत. प्रश्न निवारण्यासाठी वृत्ती लागते. वृत्ती असली कीं वेळ काढता येतो.
वपूर्झा /190/Surendra /23112024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा