" विचार शृंखला: 43/44/45/ :01102025 "
43) " आम्ही कोण आहोत? जनावरं? छे! आम्ही पूर्णत्वाने जनावरंझालो तर चांगलं होईल. जनावरं वाजवीपेक्षा जास्त खात नाहीत. जनावरं बलात्कार करीत नाहीत. जनावरं सज्जनांची राजरोस हत्या करून ' दयेचा अर्ज ' करीत नाहीत. ". वपूर्झा/ Surendra/01102025. Ooo. 44) " आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही. वेळेच भान ठेवणे महत्वाचं. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या माणसांचा आक्रोश, म्हणजे इतिहास. ट्यालेन्टेड पण वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते. ". वपुर्झा/Surendra/01102025. Ooo. 45) " काही जात नसतं तेव्हाच लोकांना जास्त उचापती हव्या असतात. ज्याला थोडी का होईना, झीज सोसावी लागते तो विचार करून बोलतो. " . वपुर्झा/Surendra/01102025. Ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा