" विचार शृंखला: 50/ 51/52 : 051002025 "
50) " ओळख हा शब्द फार फसवा आहे. ओळख ही प्रत्येक क्षणी निरनिराळ्या स्वरूपात होते. रक्तमासांची नातीदेखील फसवी. आपण स्वतःलाही प्रत्येक क्षणी नव्याने समजतो. सर्वात जवळच्या माणसांच्या वागण्याचे धक्के जास्त बसतात. कारण त्यांच्या पहिल्या ओळखीपाडून ती खूप अंतरावर गेलेली असतात. तेव्हा ' ओळख ' शब्दाचं नातं ' चालू वर्तमानकाळा ' शीच असतं. " 51) " आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्न उराशी असतात म्हणून आज मृत्यूला कवटालावं असं वाटत नाही. " . 52) " प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय ह्याचं एक ठसठसनारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठ बोलता येतं नाही. "वपूर्झा/सुरेंद्र/05102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा