" विचार शृंखला: 40/41/42/ :30092025 "
40) " कुणी कोणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहोर येण्याचा काळ संपला हे जाणावं. ". वपूर्झा/ Surendra/30092025. Ooo. 41) " कबुतरला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येतं नाही. ". वपुर्झा/Surendra/30092025. Ooo. 42) " माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठे, कशी प्रकट होईल, हे सांगता यायचं नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वनसक होईल, हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही. " वपुर्झा/Surendra/30092025. Ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा