विचार शृंखला : 99/100/101/102 : 25102025
99) " रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो ह्यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय ह्याचा पत्ता लागतं नाही, त्याचा होतो. "
100) " शत्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. "
101 ) " दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रित असतांना, वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा. उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं..... अनेक समस्याचं......
102) ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्याला पांगतिमधलं कोणतंही पान चालतं. "
वपूर्झा/सुरेंद्र/25102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा