" विचार शृंखला : 92/83/94/95 : 23102025
92) " दुःख आणि डोंगर ह्याच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरे दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसच दुःखाचं. जवळ गेलं की ह्या दोन्ही गीष्टी पार करता येणार नाहीत, असं वाटतं. त्यांचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवाण होतं. "
93) " आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतोय. "
94) " दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. "
95) " बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तरुण्यातच अनुभवता- उपभोगता येतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/23102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा