गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 56/57 : 09102025 "

" विचार शृंखला : 56/57            : 09102025 "


56)       ".    म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आपण फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ते चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते. मानसिक तयारी. आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आतापासूनच गृहीत धरायला हवं. 

57)       " फार तर्क-तर्क, माणसाचा एकांत वाढवत जातो. तो तर्क कर्ककर्क श होत जातो. फार फार

' मॅटर ऑफ फॅक्ट ' - होतो. तुसता तर्क करीत राहणारा माणूस फार संशयी होत जातो. त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागतं नाही. असं का होत जातं? तर- तर्कलाही सत्याचा, वास्तवतेचा आधार लागतोच. ज्या तर्काला वस्तूस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड जाणिवेने  करायची असते. जी माणसं तशी धडपड करतात त्यांची वाढ होते. ज्यांचं तर्कावरच प्रेम बसतं ती माणसं तिथल्या तिथे फिरतात. स्वतः दुःखी होतात, इतरांना दुःखी करतात. आपल्या अपरिपक्व विचारांमुळे इतरांना दुःखी करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. याचा विचार अशी माणसं करीत नाहीत. नरक-नरक म्हणतात तो ह्या यातने पेक्षा वेगळा असतो का? 

वपूर्झा/सुरेंद्र/09102025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा