" विचार शृंखला : 76/77/78 : 18102025 "
76) " माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं. फार कशाला, सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. " 77) " आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटानवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल. " 78) ". सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येतं नाही. आणि पचवताही येतं नाही. " वपूर्झा/सुरेंद्र/18102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा