विचार शृंखला :103/104/105 : 28102025
103) " बेदम पैसा मिळवणं ह्याचाईतकं मिडीऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं. "
104) " स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच " पालक " शब्द समजला. "
105 ) " माणसाने फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं, हे ठरवायला हवं, आणि ते मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. "
वपूर्झा/सुरेंद्र/28102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा