" विचार शृंखला : 67/68/69 : 13102025 "
67) " प्रत्येक वेळेला रडणाऱ्याच सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. जोतिपेक्षा समई जास्त तापत नाही का?
68) " सुखामागे माणूस पळतो. पळतांना पडतो, ठेचकाळतो. पस्तावून परततो. तो त्याचा परतण्याचा काळ म्हणजे खरा सोख्याचा काळ. नेमक्या त्या काळात त्याला साथ मिळत नाही. सावलीची वाण पडते. व्यथेला श्रोता मिळत नाही. त्याला कोणी जवळ करीत नाही. "
69) " खऱ्या भावना, खरी कृती, आणि निसर्गदत्त वृत्ती ह्या अडाणी, अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समजतात, तेव्हड्या तुम्हा-आम्हाला समजत नाहीत. शिक्षण मिळवून आपण शब्दांना वाजवीपेक्षा जास्त तरी महत्व देतो, नाहीतर त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. अडाणी माणसं जें मनात येतं ते दाखवून मोकळी होतात. "
वपूर्झा/सुरेंद्र/13102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा