" विचार शृंखला : 58/59/60 : 10102025 "
58) " अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गरजा राज्यकर्त्यांनी पुरवायच्या असतात. ह्या भागल्या की उरलेला सगळा ङामङौल असतो. दर्जा, पत, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळे राक्षस. त्यामुळे जहापन्हा, अमिरउमरावांना प्रतिष्ठा विकत घेता येते म्हणून ते खूष. झोपडपट्टीत हे राक्षस नांदत नाहीत म्हणून कनिस्ठेतर वर्ग खूष. " 59) " भीतीमधूनच फिलॉसॉफी निर्माण होते असं नाही. स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो. " 60) " संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते. " वपूर्झा/सुरेंद्र/10102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा