" विचार शृंखला :96/97/98 : 24102025
96) " कोणतेही समर्थन मूळ दुःखाची हाकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. "
97) " रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्यांचं नेमक दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणारं नाही, हे दुःख फार मोठ असतं. आपल्यावाचून कुणाचतरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. "
98) " दुसऱ्याच्या पगाराची, मिळकतीची चौकशी करणं हे अत्यन्त संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे. त्याच प्रमाणे ' तुम्हाला आता काय कमी आहे? ' असंही फाडकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात. "
वपूर्झा/सुरेंद्र/24102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा