" विचार शृंखला : 70/71/72 : 14102025 "
70) " आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खातांना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा. उडी मारून रुळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा! जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंगतीतलं पिवळ्याधमक केशरी जिलब्यांचं ताट म्हणजे मधुमेह असली त्रैराशिकदिसायला लागतात तेव्हा, म्हातारपण आलं असं खुशाल समजावं. " 71 ) " माणूस पैशाशिवाय जगू शकतो, अब्रू गेली तरी मजेत राहू शकतो. पण खुर्ची गेली की त्याची काय अवस्था होते हे पहायचं असेल तर कोणत्याही सेवानिवृत्त माणसाकडे पाहा. '72) " निसर्ग निरनिराळ्या वयाला निरनिराळ्या देणग्या देतो. बालपणात कुतूहलाची देणगी, किशोरवस्थेत सगळ्या जगावर खूष राहण्याची देणगी, तारुण्यात तर बहरच बहर! शृंगार, प्रेम, शरीराच आकर्षण ही देणगी. लग्नानंतर वात्सल्याची देणगी. ह्या सगळ्या देणग्यांवर आपण जगतो. " वपूर्झा/सुरेंद्र/14102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा