विचार शृंखला : 81/82:19102025B
81) " नवरा अकाली गेला. वय वर्ष अट्टावीस हे मरणाचं वय नक्कीच नाही नवरा जाणं ही एक नैसर्गिक क्लायमेटी झाली. पण नंतर वर्षे न वर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं, ह्या क्लायमेटीला काय अर्थ आहे? खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते दोघांपैकी एका व्यक्तीच आयुष्य संपत, तर मागं उरतो त्याचा संसार संपतो. म्हणूनच जें सामाजिक, सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा, अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज, जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे. " 82) " प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. कधीसमर्थनासाठी. इतरांना सुचत नाही, असं नाही. ज्यांना नुसतंच सुचत ते फक्त आयुष्यभर ' मला हेच म्हणायचं होत ' असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत. " वपूर्झा/सुरेंद्र/19102025B
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा