" विचार शृंखला : 64/65/66 : 12102025 "
64) " तुम्ही नुसते असून चालत नाही. ते गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमण याला महत्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय. ". 65) " प्रॉब्लेम नसतात कुणाला? - ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैंसा, तर कधी माणसं! या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. " 66) " भित्र्या माणसाला फसण्याची धास्ती नाही. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात. काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ ईर्षा जोपासली जाते, ते निरळं! " वपूर्झा/सुरेंद्र/12102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा