मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025 "

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025

86)      "   अभिरुचीसंपन्न नवरा मिळावा, अशी काही ऐकूणएक स्त्रियांची मागणी नसेन. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात. पण to किमान माणूस तरी असावा, ही अपेक्षा गैर आहे का? असे किती संसार ध्येय-माणुसकीशून्य पुरुषांपाईवाया गेले असतील? किती संसार? किती घरं? जो सर्वसाधारण का होईना, पतीसुद्धा होऊ शकत नाही, तो आदर्श बाप तरी कसा होईल? ".                                                  87)    "   न मावणार दुःख नेहमीच जीवघेण असतं. कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठ व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठ व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या   यातनांसाठी मोठ भांड वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांड ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. "                                                88)    "  सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप श्रद्धाभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसतांना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सदहेतूचीच शंका घेतली जावी, हा ! "                                          वपूर्झा/सुरेंद्र/21102025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा