" विचार शृंखला :89/90/91 : 22102025
89) " दारिद्र अनेक प्रकारचं असतं. मानसिक, नैतिक, आर्थिक... इट इस अँन एन्डलेंस अफेयर. स्वतःच्या धर्माबरोबरच एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाज्यातल्या प्रेत्येक घटकाला होणं जरुरीच असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार. "
90) " संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना ' गुड- नाईट ' म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे असतात. "
91) " शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीतर, त्याच प्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कढ आणि आवर घातलेले आवेग- हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. "
वपूर्झा/सुरेंद्र/22102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा