विचार शृंखला :107 : 31102025
107) माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीच, दगदगीच आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा-निराशा, साफल्य- वैफल्य, सुख-दुःख, मिलन-विरह, हे सगळेच घाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय? काय अडतं? ही माणसं अशीच. हयांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत, पण संगोपनाची यातयात नको. गती हवी, प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडा-मुंगीची हत्या होतं नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/31102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा