सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

83)      "   पाच गुंडांचा तमाशा, आजूबाजूची पाच हजार माणसं शांतपणे सहन करतात. वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पण पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे असं नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं, फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण या समाजात ' पुरुषार्थ ' कुणालाच समजलेला नाही. पोलिस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय. " 

84)       "  टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस बघायला येतात ते  फक्त तेवढ्यासाठी येतात. मृत्युच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो. त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत ! त्याच्याबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. "

85)       " बायको मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही. संशय हा नेहमी दृष्टीनेच घेतला जातो असं मी म्हणत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उबग येतो. ' अति सर्वत्र वर्जयेत ' म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा-बायकोनी एकमेकांवर प्रेम करणही वाईट असतं. "

वपूर्झा/सुरेंद्र/20102025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा