विचार शृंखला :106 : 30102025
106) राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, टीव्ही, व्हिडीओ, पार्ट्या, ट्रीप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे. संवादाच नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवता का? विचारांवर प्रेम करायला शिकवतात का? यश म्हणजे तरी काय? शिक्षणातून जे मिळत नाही, ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा. माझ्या घरात माझा सगळ्यांशी संवाद आहे का/ वपूर्झा/सुरेंद्र/30102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा