शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :107 : 31102025

विचार शृंखला :107 : 31102025

 107)  माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीच, दगदगीच आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा-निराशा, साफल्य- वैफल्य, सुख-दुःख, मिलन-विरह, हे सगळेच घाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय? काय अडतं? ही माणसं अशीच. हयांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत, पण संगोपनाची यातयात नको. गती हवी, प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडा-मुंगीची हत्या होतं नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. " 

वपूर्झा/सुरेंद्र/31102025

                                                            

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :106 : 30102025

विचार शृंखला :106 : 30102025

 106)  राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, टीव्ही, व्हिडीओ, पार्ट्या, ट्रीप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे. संवादाच नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवता का? विचारांवर प्रेम करायला शिकवतात का? यश म्हणजे तरी काय? शिक्षणातून जे मिळत नाही, ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा. माझ्या घरात माझा सगळ्यांशी संवाद आहे का/ वपूर्झा/सुरेंद्र/30102025

                                                            

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :103/104/105 : 28102025

विचार शृंखला :103/104/105 : 28102025

 103)   "  बेदम पैसा मिळवणं ह्याचाईतकं         मिडीऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं. "

104)  "  स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच " पालक " शब्द समजला. "

105 )   "  माणसाने फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं, हे ठरवायला हवं, आणि ते मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. " 

वपूर्झा/सुरेंद्र/28102025

                                                            

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला:99/100/101/102 : 25102025

विचार शृंखला : 99/100/101/102 : 25102025

  99)   " रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो ह्यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय ह्याचा पत्ता लागतं नाही, त्याचा होतो. " 

100)  "   शत्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. "

101 )   "   दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रित असतांना, वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा. उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं..... अनेक समस्याचं......

102) ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्याला पांगतिमधलं कोणतंही पान चालतं. "

वपूर्झा/सुरेंद्र/25102025

                                                            

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :96/97/98 : 24102025 "

" विचार शृंखला :96/97/98 : 24102025

96)      "   कोणतेही समर्थन मूळ दुःखाची हाकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. "

97)    "   रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्यांचं नेमक दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणारं नाही, हे दुःख फार मोठ असतं. आपल्यावाचून कुणाचतरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. "

98)       "  दुसऱ्याच्या पगाराची, मिळकतीची चौकशी करणं हे अत्यन्त संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे. त्याच प्रमाणे  ' तुम्हाला आता काय कमी आहे? ' असंही फाडकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात. "      

वपूर्झा/सुरेंद्र/24102025

                                                            

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :92/83/94/95:23102025 "

" विचार शृंखला : 92/83/94/95 : 23102025

92)      "   दुःख आणि डोंगर ह्याच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरे दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसच दुःखाचं. जवळ गेलं की ह्या दोन्ही गीष्टी पार करता येणार नाहीत, असं वाटतं. त्यांचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवाण होतं. "

93)    "   आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतोय. "

94)       "  दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. "

95)       " बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तरुण्यातच अनुभवता- उपभोगता येतो. " 

वपूर्झा/सुरेंद्र/23102025

                                                            

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :89/90/91 : 22102025 "

" विचार शृंखला :89/90/91 : 22102025

89)      "   दारिद्र अनेक प्रकारचं असतं. मानसिक, नैतिक, आर्थिक... इट इस अँन  एन्डलेंस अफेयर. स्वतःच्या धर्माबरोबरच एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाज्यातल्या प्रेत्येक घटकाला होणं जरुरीच असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार. "

90)       "   संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना ' गुड- नाईट ' म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे असतात. "

91)       "  शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीतर, त्याच प्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कढ आणि आवर घातलेले आवेग- हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. "

वपूर्झा/सुरेंद्र/22102025

                                                            

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025 "

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025

86)      "   अभिरुचीसंपन्न नवरा मिळावा, अशी काही ऐकूणएक स्त्रियांची मागणी नसेन. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात. पण to किमान माणूस तरी असावा, ही अपेक्षा गैर आहे का? असे किती संसार ध्येय-माणुसकीशून्य पुरुषांपाईवाया गेले असतील? किती संसार? किती घरं? जो सर्वसाधारण का होईना, पतीसुद्धा होऊ शकत नाही, तो आदर्श बाप तरी कसा होईल? ".                                                  87)    "   न मावणार दुःख नेहमीच जीवघेण असतं. कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठ व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठ व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या   यातनांसाठी मोठ भांड वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांड ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. "                                                88)    "  सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप श्रद्धाभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसतांना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सदहेतूचीच शंका घेतली जावी, हा ! "                                          वपूर्झा/सुरेंद्र/21102025

                                                            

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

83)      "   पाच गुंडांचा तमाशा, आजूबाजूची पाच हजार माणसं शांतपणे सहन करतात. वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पण पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे असं नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं, फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण या समाजात ' पुरुषार्थ ' कुणालाच समजलेला नाही. पोलिस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय. " 

84)       "  टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस बघायला येतात ते  फक्त तेवढ्यासाठी येतात. मृत्युच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो. त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत ! त्याच्याबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. "

85)       " बायको मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही. संशय हा नेहमी दृष्टीनेच घेतला जातो असं मी म्हणत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उबग येतो. ' अति सर्वत्र वर्जयेत ' म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा-बायकोनी एकमेकांवर प्रेम करणही वाईट असतं. "

वपूर्झा/सुरेंद्र/20102025

                                                            

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 81/82:19102025B "

विचार शृंखला : 81/82:19102025B

81)      "   नवरा अकाली गेला. वय वर्ष अट्टावीस हे मरणाचं वय नक्कीच नाही नवरा जाणं ही एक नैसर्गिक क्लायमेटी झाली. पण नंतर वर्षे न वर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं, ह्या क्लायमेटीला काय अर्थ आहे? खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते दोघांपैकी एका व्यक्तीच आयुष्य संपत, तर मागं उरतो त्याचा संसार संपतो. म्हणूनच जें सामाजिक, सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा, अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज, जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे. "                                                    82)       "  प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. कधीसमर्थनासाठी. इतरांना सुचत नाही, असं नाही. ज्यांना नुसतंच सुचत ते फक्त आयुष्यभर ' मला हेच म्हणायचं होत ' असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत. "                                                  वपूर्झा/सुरेंद्र/19102025B

                                                            

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 79/80 : 19102025A "

" विचार शृंखला : 79/80 : 19102025A "

79)    "  माणसाची ग्यारंटी नाही म्हणून मी लग्न जमवण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला माहीत असलेला मुलगा किंवा मुलगी, नवरा आणि बायको ही दोन नाती वगळून एरवी कशी आहेत तेव्हढच माहीत असतं. आय. एस. आय. कंपनीचा शिक्का ज्यावर कधीही मारता येणार नाही असं  माणूस ' नावाचं एक और यंत्र आहे. " 80)     "  अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थानें ज्याची हानी भरून येतं नाही अशी गोष्ट किती उरली आहे, ह्याचा हिशोब नसतांना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. ' मन रमवणे ' ह्या नावाखाली गपागोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळण, मोबाईल अथवा कॉम्प्युटर वर गेम खेळण, पार्ट्या, सिनेमेच सिनेमे बघत सुटणे, निंदानालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनटयांच्या भानगडीची साप्ताहिक वाचण आणि यापैकी काहीही नसेल तर दिवसाच्या दिवस लोळून काढणारे बहाद्दर असतात. "                                          वपूर्झा/सुरेंद्र/19102025

                                                            

" विचार शृंखला : 76/77/78 : 18102025 "

" विचार शृंखला : 76/77/78 : 18102025 "

76)      " माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं. फार कशाला, सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. "                                                  77)     "  आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटानवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल. "        78)    ".   सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येतं नाही. आणि पचवताही येतं नाही. "                    वपूर्झा/सुरेंद्र/18102025

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 73/74/75 : 16102025 "

" विचार शृंखला : 73/74/75 : 16102025 "

73)      "   प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो. "                  74)       "   जी माणसं भावनाप्रधान असतात, त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होत. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुढतात, आणि निवृत्तीचा मार्ग  पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. हयाउलट काही माणसं चिडून उठतात. सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वांर करीत सुटतात. अशी माणसं एके काळी भावनाप्रधान होती, हे सांगून खरे वाटत नाही. "                                            75)       ' स्त्री ' जन्माला घालतांना परमेश्वराने तिला विचारलं, ' तुला बुद्धी हवी की सौदर्य? ' तेव्हा स्त्री म्हणाली, ' बुद्धीची गरज नाही, सौदर्य दे! ' ' का ', ' बुद्धीच्या सामर्थ्यावर सौदर्य मिळवता येतं नाही, पण  सौन्दर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते. "                                            वपूर्झा/सुरेंद्र/16102025

                                                            

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 70/71/72 : 14102025 "

" विचार शृंखला : 70/71/72 : 14102025 "

70)       "  आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खातांना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा. उडी मारून रुळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा! जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंगतीतलं पिवळ्याधमक केशरी जिलब्यांचं ताट म्हणजे मधुमेह असली  त्रैराशिकदिसायला लागतात तेव्हा, म्हातारपण आलं असं खुशाल समजावं. " 71 )      "    माणूस पैशाशिवाय जगू शकतो, अब्रू गेली तरी मजेत राहू शकतो. पण खुर्ची गेली की त्याची काय अवस्था होते हे पहायचं असेल तर कोणत्याही सेवानिवृत्त माणसाकडे पाहा. '72)       "   निसर्ग निरनिराळ्या वयाला निरनिराळ्या देणग्या देतो. बालपणात कुतूहलाची देणगी, किशोरवस्थेत सगळ्या जगावर खूष राहण्याची देणगी, तारुण्यात तर बहरच बहर! शृंगार, प्रेम, शरीराच आकर्षण ही देणगी. लग्नानंतर वात्सल्याची देणगी. ह्या सगळ्या देणग्यांवर आपण जगतो. "                    वपूर्झा/सुरेंद्र/14102025

                                                            

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 67/68/69 : 13102025 "

" विचार शृंखला : 67/68/69 : 13102025 "

67)       "   प्रत्येक वेळेला रडणाऱ्याच सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. जोतिपेक्षा समई जास्त तापत नाही का?

68)       "    सुखामागे माणूस पळतो. पळतांना पडतो, ठेचकाळतो. पस्तावून परततो. तो त्याचा परतण्याचा काळ म्हणजे खरा सोख्याचा काळ. नेमक्या त्या काळात त्याला साथ मिळत नाही. सावलीची वाण पडते. व्यथेला श्रोता मिळत नाही. त्याला कोणी जवळ करीत नाही. "

69)       "   खऱ्या भावना, खरी कृती, आणि निसर्गदत्त वृत्ती ह्या अडाणी, अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समजतात, तेव्हड्या तुम्हा-आम्हाला समजत नाहीत. शिक्षण मिळवून आपण शब्दांना वाजवीपेक्षा जास्त तरी महत्व देतो, नाहीतर त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. अडाणी माणसं जें मनात येतं ते दाखवून मोकळी होतात. "

वपूर्झा/सुरेंद्र/13102025

                                                            

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 64/65/66 : 12102025 "

" विचार शृंखला : 64/65/66 : 12102025 "

64)    "   तुम्ही नुसते असून चालत नाही. ते गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमण याला महत्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय. ".      65)    "    प्रॉब्लेम नसतात कुणाला? - ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैंसा, तर कधी माणसं! या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. "                                                  66)   "     भित्र्या माणसाला फसण्याची धास्ती नाही. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात. काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही  बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ  ईर्षा जोपासली जाते, ते निरळं! "                    वपूर्झा/सुरेंद्र/12102025

                                                            

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 61/62/63 : 11102025 "






" विचार शृंखला : 61/62/63  : 11102025 "

61)       "    भांबावलेला माणूस अस्थिर असतो. अस्थिर माणसाची विचारशक्ती क्षीण बनते. क्षीण विचारांची माणसं एकत्र येतं नाहीत. माणसं एकत्रित नाहीत म्हणजे संघशक्ती नाही. संघशक्तीशिवाय आंदोलन अशक्य! "

62)       "     माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एव्हडाच असतो. "

63)       "      सुख, सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. स्वतःला सुखी समजणारी इतर माणसंही सवयीने सुखी झालेली असतात. शेकडा नव्वद टक्के लोकांना जे मिळतं ते आपल्यालाही मिळालं आहे ह्या जाणीवेतून ती सुखी होतात. " 

वपूर्झा/सुरेंद्र/111102025

                                                            

           

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 58/59/60 : 10102025 "

" विचार शृंखला : 58/59/60  : 10102025 "

58)   " अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गरजा राज्यकर्त्यांनी पुरवायच्या असतात. ह्या भागल्या की उरलेला सगळा  ङामङौल असतो. दर्जा, पत, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळे राक्षस. त्यामुळे जहापन्हा, अमिरउमरावांना प्रतिष्ठा विकत घेता येते म्हणून ते खूष. झोपडपट्टीत हे राक्षस नांदत नाहीत म्हणून कनिस्ठेतर वर्ग खूष. "             59)  "    भीतीमधूनच फिलॉसॉफी निर्माण होते असं नाही. स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो. "                              60)   "    संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते. "                                              वपूर्झा/सुरेंद्र/10102025

                                                            

" विचार शृंखला : 56/57 : 09102025 "

" विचार शृंखला : 56/57            : 09102025 "


56)       ".    म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आपण फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ते चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते. मानसिक तयारी. आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आतापासूनच गृहीत धरायला हवं. 

57)       " फार तर्क-तर्क, माणसाचा एकांत वाढवत जातो. तो तर्क कर्ककर्क श होत जातो. फार फार

' मॅटर ऑफ फॅक्ट ' - होतो. तुसता तर्क करीत राहणारा माणूस फार संशयी होत जातो. त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागतं नाही. असं का होत जातं? तर- तर्कलाही सत्याचा, वास्तवतेचा आधार लागतोच. ज्या तर्काला वस्तूस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड जाणिवेने  करायची असते. जी माणसं तशी धडपड करतात त्यांची वाढ होते. ज्यांचं तर्कावरच प्रेम बसतं ती माणसं तिथल्या तिथे फिरतात. स्वतः दुःखी होतात, इतरांना दुःखी करतात. आपल्या अपरिपक्व विचारांमुळे इतरांना दुःखी करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. याचा विचार अशी माणसं करीत नाहीत. नरक-नरक म्हणतात तो ह्या यातने पेक्षा वेगळा असतो का? 

वपूर्झा/सुरेंद्र/09102025

                                                            

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 53/ 54/55 : 081002025 "

" विचार शृंखला: 53/ 54/55  : 081002025 "

53)       "  मी एक छोटा माणूस आहे. मी पुढाऱ्यांची पण पूजा करीत नाही आणि सरकारची पण नाही. निरपराध माणूस भरडला गेला की डोळ्यांच्या कडा ओल्या होणारा मी एक साधा जीव आहे. रात्रीचा अंधार पडला की डोळ्यासमोर असंख्य प्रश्न नाचतात. ते सोडवता सोडवता ग्लानी येते आणि त्याच प्रश्ननांनी जाग येते. "                                                    54)        "    माणसं खळखळून  मोकळी होत नाहीत. गप्प राहतात. सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमवतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्श नाही. "                            55)       " नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात. "                      वपूर्झा/सुरेंद्र/08102025

                                                            

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 50/ 51/52 : 051002025 "

" विचार शृंखला: 50/ 51/52   : 051002025 "

50)       "  ओळख हा शब्द फार फसवा आहे. ओळख ही प्रत्येक क्षणी निरनिराळ्या स्वरूपात होते. रक्तमासांची नातीदेखील फसवी. आपण स्वतःलाही प्रत्येक क्षणी नव्याने समजतो. सर्वात जवळच्या माणसांच्या वागण्याचे धक्के जास्त बसतात. कारण त्यांच्या पहिल्या ओळखीपाडून ती खूप अंतरावर गेलेली असतात. तेव्हा ' ओळख ' शब्दाचं नातं  ' चालू वर्तमानकाळा ' शीच असतं. "                                          51)        " आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्न उराशी असतात म्हणून आज मृत्यूला कवटालावं असं वाटत नाही. "                      .   52)   " प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय ह्याचं एक ठसठसनारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठ बोलता येतं नाही. "वपूर्झा/सुरेंद्र/05102025

                                                            

" विचार शृंखला: 48/49 :041002025 "

" विचार शृंखला: 48/49     :041002025 "

48)       "  दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दांचा चेहरा दिसतं नाही आणि त्याचा वासंही ओळखता येतं नाही. मग तो माणूस अजाणपणे सगळ्यांनाच दुःख सांगत सुटतो किंवा सगळ्यांपासून पळण्याचा प्रयत्न करतो. "

वपूर्झा/ Surendra/04102025.                            Ooo.                                                           49)   "  मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर..... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे  जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात. "

वपुर्झा/Surendra/04102025.  

Ooo.                                                             

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 46/47 :03102025 "

" विचार शृंखला: 46/47      :03102025 "

46)       "  आकाशात जेव्हा एखादा कृतिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. "

वपूर्झा/ Surendra/03102025.                            Ooo.                                                           47)   "  ' इट जस्ट हॅपॅन्स ' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जात. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थ्यांचे शिष्य?. ' मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे, ' -- अकरा शब्दांत समर्थानी सगळं उकलून दाखवलं.'

वपुर्झा/Surendra/03102025.  

Ooo.                                                             

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 43/44/45 :. 01102025 "

" विचार शृंखला: 43/44/45/       :01102025 "

43)       "  आम्ही कोण आहोत?  जनावरं? छे! आम्ही पूर्णत्वाने जनावरंझालो तर चांगलं होईल. जनावरं वाजवीपेक्षा जास्त खात नाहीत. जनावरं बलात्कार करीत नाहीत. जनावरं सज्जनांची राजरोस हत्या करून ' दयेचा अर्ज ' करीत नाहीत. ".                                            वपूर्झा/ Surendra/01102025.                  Ooo.                                                      44)   "  आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही. वेळेच भान ठेवणे महत्वाचं. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या माणसांचा आक्रोश, म्हणजे इतिहास. ट्यालेन्टेड पण वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते. ".       वपुर्झा/Surendra/01102025.            Ooo.                                                          45)   "   काही जात नसतं तेव्हाच लोकांना जास्त उचापती हव्या असतात. ज्याला थोडी का होईना, झीज सोसावी लागते तो विचार करून बोलतो. " .      वपुर्झा/Surendra/01102025.                    Ooo