" उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'
000o000
" काळ म्हटलं कीं वर्ष आली, महिने आले, महिन्याचे दिवस आणि दिवसांचे तासही आले. तासांनाही मर्यादा आहेच. सात दोनदा वाजतात. आठ, नऊ, दहा, अकरा, बारा,..... सगळे तास दोनदा वाजतात. एव्हढया प्रचंड, अनादि- अनंत काळाची किती छोटी शकलं? चोवीस तासांचा एवढास्सा तरजू. तो कसा काळाला न्याय देईल? दोन पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो. वेळेइतकाच छोटा होतो. क्षुद्र होतो. माणूस क्षुद्र होतो आणि काळचं काम सोपं होत. क्षुद्र कीटकला मारण्यासाठी फार बळ वापराव लागतं नाही. काळ फक्त वेळ साधतो. सेकंदाइतका छोटा होतो. उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'
वपुर्झा /86/Surendra /18022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा