" परमेश्वराची योजना निराळी असते "
000o000
" परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवलं केली कीं बॅलन्स जातो. तोल बिघडतो. त्याची रचना पाहा, तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो. ' भगवंता, कसली जोडीदारीण देतोस? ' म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौदंर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो - आणि केवळ रुपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणूनच वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलतातच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो.
वपुर्झा /12/Surendra /06022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा