" शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात "
000o000
" राजकीय पातळी वरचे प्रश्न आपल्या आकलनापलीकडे आहेत. शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात, ते वर्तमाणपत्रातून. त्यातल्या सत्यासत्यतेची तरी कुठे शाश्वती आहे? कोणतं ना कोणतं वृत्तपत्र कोणत्या ना कोणत्या पक्षाला, नाहीतर उद्योगपती्ना विकलं गेलं आहे. ते खरं तर News papers नाहीत तर Views papers आहेत. एखादा प्रचंड मोठा भ्रष्टाचार प्रथम उघडकीस आला की, तो मथळ्याचा विषय होतो. चौकशी समिती नेमून काही प्रतिष्ठितांची चार पाच महिने सोय होते. हळूहळू त्या Headlines चीं पीछेहाट होते, चौथ्या पानावर तिचा Tail piece होतो आणि रोज नव्या भ्रष्टाचारासाठी मथळ्याची जागा रिकामी ठेवावी लागते. न्यूटनच्या मूव्हमेन्टच्या तत्वाप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे कीं, तिच्याच गतीने राज्य आपोआप चाललं आहे."
वपुर्झा /Surendra /03022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा