" आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात."
000o000
" चालायला शिकणार मूलच फक्त स्वतःच्या पायांवर चालत. ते जस जस मोठ व्हायला लागतं तसं तसं ते स्वतःला पाय आहेत हे विसरायला लागतं. नंतरच्या आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पत, ऐपत, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, कीर्ती, यश, लौकिक, प्रसिद्धी, राजकारण, स्पर्धा, पक्ष, जात, धर्म परंपरा, रूढी..... पायच पाय. ह्या पायांच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एकेक पाय गळायला लागतात. 'सत्ता ' हा एक महत्वाचा पायच जातांना खूपच पाय नेतो. वार्धक्य जवळ येईतो सगळं गेललं असतं. तोपर्यंत आपल्याला स्वतःचे पाय होते ह्याच विस्मरण झालेलं असतं, ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखलं जात होत. वार्धक्यात गुढगे गेले असं म्हणायचं. खरं तर सगळे पायच गेलेले असतात.
वपुर्झा /83/Surendra /17022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा