"आपण सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी."
000o000
" असा बघतोस काय मित्रा? -- बाबा रे, आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून, ' मजेत जगण्यासाठी ' आहे. ' Life is for Living' ह्याच्यापुढे ' Happily' हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी, पण हसत जगाव. पर्वा करू नये. त्यासाठी प्रथम स्वतःच रक्षण करावं. ' आत्मानं सततं रक्षेत!' आता हे रक्षण कुणापासून? परचक्रापासून? No राजा No! युद्ध वारंवार होत नाहीत. आणि झाली तरी त्यासाठी मिल्ट्री आहे. आपण सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात, त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. "
वपुर्झा /56/Surendra /14022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा