" स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं "
000o000
" जगायचं - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं __ म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नही हवीत. केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकट आणि यातना, त्यांच्या येत ऊच्याराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला मस्त बनवते , मस्तवाल बनवत नाही. ' वर्तमान मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो. कारण ह्या माणसांच्या गरजा क्षणांशी निगडीत असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं की, यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळ ओझच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचे सामर्थही भूतकाळातच असतं . अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायच असतं, तीच माणसं गेलेल्या काळाच काही देणं लागतं नाहीत.' ' हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.
वपुर्झा /94/Surendra /20022025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा