" बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही."
000o000
" एक मनुष्यजन्म. तोही म्हणे चौरऐशी लक्ष फेऱ्यानंतर. अर्थातं मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला दिसतो तो समोरचा जिताजागता माणूस. त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ. उत्पत्ती, स्थिती, लय, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला. बालपण, तारुण्य, वार्धक्य. जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ - तारुण्य. संततीच्या रूपाने माणसाला तारुण्यात, बालपण पुन्हा अनुभवता येत, पण वार्धक्यात तारुण्य अनुभवता येत नाही. जाणिवा जाग्या झाल्या पासून प्रत्येक जण आतुरतेने वाट पहातो, ती तारुण्याची. तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडविण्याचा काळ आहे. बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता - उपभोगता येतो " वपुर्झा /17/Surendra /07022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा