" पोरकेपणा म्हणजे काय? "
000o000
" पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना नं समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होत. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडत. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस! पण त्याच वेळेला मला आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहेहे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याच कारण, मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, माग काहीतरी राहायला हवं. त्यां राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. थैलीच तोंड सुटलं कीं सुटणारी तोंड घट्ट मिटतात. नीती - अनीतीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतांत. म्हणूनच पैशेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरण सोपं जातं. कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात.
वपुर्झा /39/Surendra /12022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा