" क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे, ह्याच आत्मनिरीक्षण करावं."
000o000
" शरण आल्याने फरक पडत नाही. रिaलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकेदायक. क्षमा मागं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकाव लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे, ह्याच आत्मनिरीक्षण करावं."
वपुर्झा /106/Surendra /26022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा