" किती दमता तुम्ही? "
000o000
" किती दमता तुम्ही? " ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषालापण ! इतर कितीही गरजा असोत, पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्यां पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरीं करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कौतुक टिकतं. ' त्यात काय आहे, हे मी पण करीन ' - इथं अर्पणभाव संपला, स्पर्धा आली. कौतुक संपलं, तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली.
वपुर्झा /22/Surendra /08022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा