"त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला "
000o000
" शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पूरी नं होणं ह्यासारखा शाप नाही. पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता नं कळण ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला . "
वपुर्झा /23/Surendra /08022025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा